रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक पवन हरदास यांचे संशोधन कार्य समाजाभिमुख असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य बसवराज चडचण, पर्यवेक्षिका वैदेही वैद्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अक्कलकोट,
रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक पवन हरदास यांचे संशोधन कार्य समाजाभिमुख असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी केले.

येथील सी. बी. खेडगी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.पवन हरदास यांना टी.बी. संशोधनासाठी रसायनशास्त्रातील पेटंट जाहीर झाल्याबद्दल चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आले. त्याप्रसंगी खेडगी बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सिध्दाराम पुजारी,प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट बोलताना म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने आपल्या संशोधनाची दिशा समाजाभिमुख ठेवावे व त्याचा उपयोग उद्योग क्षेत्राला होऊन गोरगरिबांच्या सेवेसाठी आपले संशोधन असावे. पवन हरदास यांना मिळालेले पेटंट हे समाजातील गरीब घटकांना निश्चितच उपयोग ठरेल. एकाच पेटंट वर न थांबता यापुढे असेच कार्य करत राहावे, अशी शुभेच्छा याप्रसंगी दिले.

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या गेल्या ५३ वर्षाच्या इतिहासात प्रा. पवन हरदास हे पहिले पेटंट ठरले आहेत. म्हणून संस्था व महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आले.

यावेळी उपप्राचार्य बसवराज चडचण, पर्यवेक्षिका वैदेही वैद्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.