हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दुर्गा अष्टमी निमित्त न्यासाच्या प्रांगणात संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी भोंडला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा..
श्री स्वामी समर्थ, श्री अन्नपूर्णा माता आणि आई तुळजाभवानीच्या प्रतिमेसह हत्तीच्या मूर्तीचे पूजन न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या मंत्रपठाणाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला

हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दुर्गा अष्टमी निमित्त न्यासाच्या प्रांगणात संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी भोंडला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा..


🔶अक्कलकोट :(प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून दुर्गा अष्टमी निमित्त न्यासाच्या प्रांगणात अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी भोंडला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.*

भोंडल्यात विविध प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. पूर्वीच्या काळी रचलेली ही गाणी त्या काळातील परिस्थितीनुसार रचलेली आहेत. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या आराधनेने करण्यात आली. यामध्ये ‘ऐैलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा’. याशिवाय अनेक गाणी यात म्हटंली गेली. दरम्यान श्री स्वामी समर्थ, श्री अन्नपूर्णा माता आणि आई तुळजाभवानीच्या प्रतिमेसह हत्तीच्या मूर्तीचे पूजन न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या मंत्रपठाणाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


याप्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून मल्लम्मा पसारे, डॉ.अशावरी पेडगावकर, लता मोरे, रुपाली शहा, डॉ.पवित्रा मलगोंडा, संगीता राठोड, जया सुरवसे, केतकी नकाते, रुपाली रामदासी, आशा भगरे, प्रीती रणसुभे हे उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, सचिवा अर्पिताराजे भोसले, कु.तेजुराजे भोसले, कु. स्वामिनिराजे भोसले, खजिनदार स्मिता कदम, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, संगिता भोसले, उज्वला भोसले, पल्लवी कदम, अंबूताई पवार, पल्लवी नवले, स्वाती निकम, छाया पवार, राजश्री माने, क्रांती वाकडे व सभासद कविता वाकडे, शिला मचाले, साधना मचाले, ज्योती मोरे, सुषमा माने, प्रीती रणसुभे, नीता सूर्यवंशी, शुभांगी घाडगे, सचिता पाटील, सोनाली पाटील, निर्मला साठे, रुपाली पवार, प्रमोदिनी सूर्यवंशी, शोभा पोळ, सुवर्णा घाडगे, तृप्ती बाबर, प्रेरणा पाटील, मीनल शहा, राजश्री कलशेट्टी, सुनंदा अष्टगी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.