गावगाथा

गोरगरीब कुस्तीगीरांसाठी स्वामींचा प्रसाद — अन्नछत्र मंडळाचा उपक्रम सतत सुरू

सामाजिक बांधिलकी जपणारे अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट

 गोरगरीब कुस्तीगीरांसाठी स्वामींचा प्रसाद — अन्नछत्र मंडळाचा उपक्रम सतत सुरू

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, तर न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सराव करणाऱ्या गोरगरीब कुस्तीगरांसाठी “स्वामींचा प्रसाद”रूपी खुराक किटचे वाटप सतत सुरू आहे. या उपक्रमांतर्गत नोव्हेंबर महिन्यातील ७७ किटचे वाटप गुरुवारी करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

तालुक्यातील अनेक कुस्तीगीर कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर येथे सरावासाठी असतात. त्यांची गरज ओळखून गत मकर संक्रांतीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला. प्रारंभी ५० जणांना किट देण्यात आले होते. आता नियमितपणे महिन्याला किट वाटप होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

गेली ३८ वर्षे अविरत अन्नदानाचे कार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ देशभर ख्यातनाम आहे. दररोज लाखो भाविक येथे “समर्थ महाप्रसादाचा” लाभ घेतात. त्याच सेवाभावातून तालुक्यातील गोरगरीब पैलवानांसाठी खुराक किटचे वाटप सुरू केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

या किटमध्ये तूप, बदाम, खारीक, बडीशोप, खसखस, वेलची, धणे इत्यादी स्वास्थ्यवर्धक वस्तूंचा समावेश आहे. तालुक्यातील चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वेक्षण करून ७७ पैलवानांची निवड करण्यात आली. याकामी उपमहाराष्ट्र केसरी पै. मौला शेख बादोला, पै. महेश कुलकर्णी, सरफराज शेख, अतिश पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी मंगळवेढा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत अमोलराजे पैलवान ग्रुपचा पै. मशीद शेख याने गदा पटकवल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, रोहन शिर्के, गोटू माने, प्रवीण घाटगे, शहाजी यादव, नंदकुमार स्वामी, पै. विशाल ढेकळे, पै. अमोल चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button