गावगाथा

पिंपळपानावर कलाकृती साकारत बाळासाहेबांना अभिवादन…!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पानावरील अप्रतिम कलाकृती. इनसेटमध्ये चित्रकार डाॅ.संदीप डाकवे

पिंपळपानावर कलाकृती साकारत बाळासाहेबांना अभिवादन…!

HTML img Tag Simply Easy Learning    

तळमावले/वार्ताहर

HTML img Tag Simply Easy Learning    

17 नोव्हेंबर हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन. या स्मृतीदिनाचे औचित्य साधत बाळासाहेब ठाकरे यांचे पिंपळपानावर चित्र साकारत त्यांना विनम्र अभिवादन केले आहे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी.
विविध माध्यमातून कलाकृती रेखाटण्यात माहीर असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांनी पिंपळपानाचा नको असणारा भाग कापून बाळासाहेब ठाकरे यांची हुबेहुब कलाकृती साकारली आहे. या कलाकृतीने सर्वांनाच भुरळ घातली आहे. पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटण्यासाठी पिंपळाचे पान, पेन्सिल, ऑपेरेशन ब्लेड, इ. साहित्याचा वापर करन्यात आला आहे. डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कलाकृती रेखाटत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या चित्रांची नोंद ‘‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’’, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकाने घेतली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो कॅप्शन :
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पानावरील अप्रतिम कलाकृती. इनसेटमध्ये चित्रकार डाॅ.संदीप डाकवे

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button