प्रत्येक हिंदूच्या मनात एकच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे – पुरुषोत्तम बरडे
स्मृती दिन विशेष

प्रत्येक हिंदूच्या मनात एकच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे – पुरुषोत्तम बरडे


वंदनीय हिंदूहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज चौकात पुणे नाका शिवसेना शाखा, शिवप्रभू प्रतिष्ठान व चौत्रा पुणे नाका मंडळाच्या संयुक्त आयोजित आकर्षक मांडव सजावटीत हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस शिवसेना सोलापूर लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या हस्ते असंख्य हिंदुहृद्सम्राट प्रेमींच्या उपस्थितीत पुष्पांजली वाहत प्रचंड जयघोषात मानवंदना देण्यात आली .

हिंदूंच्या प्रत्येक मनात एकच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच राहतील. लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी स्मृतीप्रितर्थ्य आपल्या भावना व्यक्त केल्या.


अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे… हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे… एकच साहेब एकच साहेब बाळासाहेब अमर रहे.. आदी घोषवाक्याने स्मृती मांडवासह चौक परिसर दणाणून गेला होता.
यावेळी शिवसेना सोलापूर लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बरडे, महानगर क्षेत्रप्रमुख विष्णू कारमपुरी, दक्षिण विधानसभा शहरप्रमुख शरणराज केंगनाळकर, उपशहरप्रमुख शहर उत्तर सुरेश जगताप, दक्षिण समन्वयक राहुल गंधूरे, उपशहरप्रमुख शहर मध्य अमित भोसले, कॉलेज कक्षचे तुषार आवताडे, शाखा प्रमुख मारुती खानापूरे, महेश क्षीरसागर,अकील सय्यद, संजय खटके, सुनील लवटे,विजय शिंदे, महेश भारती, भारत जाधव, राजू नकाते, विष्णू जवंजाळ, गणेश खानापुरे, गौसपाक हुंडेकरी,अतुल मस्के,बापू आगलावे आदींसह हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
स्मृती मानवंदना कार्यक्रमासाठी योगेश क्षीरसागर, अजय अमनुर, योगेश खटके, विष्णू जवंजाळ,संदीप भोसले आदींनी अथक परिश्रम घेतले.