समर्थांच्या दर्शनाने भाविक आनंदी मनाने जीवन वाटचाल करतील – महाराष्ट्र केसरी राक्षे
पै.शिवराज राक्षे यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व इतर दिसत आहेत.

समर्थांच्या दर्शनाने भाविक आनंदी मनाने जीवन वाटचाल करतील – महाराष्ट्र केसरी राक्षे

येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे अखिल स्वामी भक्तांचे संकटमोचन स्थान असून येथे येणारया स्वामी भक्तांचे मन येथे पाऊल ठेवल्याबरोबर निश्चिंत होते. समर्थांच्या या कृपाछ्त्रामुळे येथे येवून समर्थांचे दर्शन घेतल्याने भाविक कृतार्थ व आनंदी मनाने आपल्या भावी जीवनाची वाटचाल करतील असे मनोगत पुणे येथील दुहेरी महाराष्ट्र केसरी विजेता पै. शिवराज राक्षे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते. यावेळी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. पुढे बोलताना राक्षे यांनी आजवर निरपेक्ष भावनेने व भक्तीभावाने आध्यात्मिक क्षेत्रात भक्तांची सेवा करणारे हे देवस्थान पर्यटनाच्या दृष्टीने जगप्रसिध्द होत आहे. आणि भविष्यात जागतिक स्तरावरील अनेक मान्यवरांचे श्री स्वामी समर्थ हे प्रमुख आराध्य दैवत असतील असेही प्रतिपादन राक्षे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, सौरभ मोरे, दिनेश हळगोदे, प्रविण घाटगे, सागर गोंडाळ, गिरीश पवार, जयप्रकाश तोळणूरे, महेश काटकर, महादेव तेली, ऋषिकेश लोणारी, मनोज जाधव, संतोष पराणे, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, प्रसाद सोनार अविनाश क्षीरसागर, मोहन शिंदे, संजय पाठक, नरेंद्र शिर्के, नागनाथ गुंजले, वैभव जाधव, भिमा मिनगले इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – पै.शिवराज राक्षे यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व इतर दिसत आहेत.
