श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

श्री स्वामी समर्थांच्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून प्रस्थान ..

सदर पालखी परिक्रमा ही ६ महिने महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह दिनांक १२ जून २०२४ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत विसावणार आहे.

श्री स्वामी समर्थांच्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून प्रस्थान ..

HTML img Tag Simply Easy Learning    

🔶अक्कलकोट : (प्रतिनिधी)
अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून शनिवारी प्रस्थान झाली.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २६ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे, यंदाचे २७ वे वर्ष असून, दरम्यान या परिक्रमेचा शुभारंभ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे पुरोहित मंदार मोहनराव पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे प.पू अण्णू महाराज पुजारी, धनंजय पुजारी, राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या पत्नी निलम सामंत, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ पदुकाच्या पूजनाने करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

सदरच्या पालखी पुजानंतर अन्नछात्रातून राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ, सोन्यामारुती चौक, वीर सावरकर चौक, मेन रोड, कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ येथे आरती, श्री मल्लिकार्जुन मंदिर, शिवछत्रपती, शिवाजी महाराज चौक (बस स्थानक) येथील श्री खंडोबा मंदिरातील आरती नंतर विजयबाग येथे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी दर्शन घेतले. त्यानंतर सोलापूरकडे पालखी मार्गस्थ झाली. दिनांक २५ रोजी मंगळवेढा तालुक्यातील सोहाळे येथे मुक्काम असणार असून दिनांक २७ रोजी पालखी सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

या शुभारंभ कार्यक्रमास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, राजेंद्र लिंबीतोटे, सुरेशचंद्र सूर्यवंशी, लक्ष्मण पाटील, पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले, मनोज निकम, अँड.संतोष खोबरे, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, पालखी पुरोहीत संजय कुलकर्णी, श्रीकांत झिपरे, सिद्धाराम कल्याणी, प्रा.शरणप्पा अचलेर, रामचंद्रराव घाडगे, अप्पा हंचाटे, बाळासाहेब मोरे, अविनाश मडीखांबे, अशोक जाधव, लखन सुरवसे, अशोक किणीकर, प्रा.प्रकाश सुरवसे, शीतल फुटाणे, सनी सोनटक्के, शिवराज स्वामी, सरफराज शेख, मैनुद्दीन कोरबू, सत्तार शेख, फहीम पिरजादे, सायबण्णा जाधव, अरविंद साळुंखे, निखील पाटील, प्रविण घाटगे, गोटू माने, संजय गोंडाळ, अतिश पवार, रोहीत खोबरे, सौरभ मोरे, वैभव मोरे, प्रथमेश पवार, विशाल कलबुर्गी, किरण पाटील, अमित थोरात यांच्यासह न्यासाचे पदाधिकारी, भक्तगण सेवेकरी, वारकरी, कर्मचारी आदीजण उपस्थित होते. सोलापूर येथील शंकरालिंग महिला भजन मंडळ व अक्कलकोटच्या महिला भजन मंडळाने सेवा रुजू केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

⭕चौकट : 
त्यांची सेवा घेण्यासाठी : न्यासाच्या वतीने अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रातील गावोगाव असलेल्या स्वामी भक्तांना करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे येता येथ नांही अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी येत आहेत.

⭕चौकट :
अपूर्व संधी : श्री समर्थ स्वामींच्या साधू-संतत्वाची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली सव्वाशे वर्षापासून उभ्या भारतभर पसरत आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचीती येऊन तद्वत त्यांच्या भाक्तींची लौकिक आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचे जिवन संपन्न बनत आहे. श्री स्वामी समर्थांची पालखी आपल्या गावी येत आहे. या योगे श्री स्वामी चरणी तन-मन-धनाने निष्ठा व सेवा अर्पण करण्याची ही अपूर्व संधी भक्तांना प्राप्त होत आहे.

⭕चौकट :
न्यासाकडून सर्वोतोपरी सहकार्य : श्री स्वामींच्या मूळस्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इच्छानेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), स्थापन झाले असून येथे दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्रतर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आपदग्रस्तांना मदत, आरोग्य विषयक इतर विविध कार्याक्रम्र राबविले जातात तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते.

⭕चौकट :
भक्तांच्या सेवेर्थ : मंडळाच्या मालकीच्या जागेत यात्री निवास, यात्री भुवन, अतिथी निवास या निवासी या निवासी इमारती कार्यारत असून महाप्रसाद गृह, ध्यान धारणा मंदिर, मंगल कार्यालय आदी सुमारे ५० कोटी खर्चाचा मोठा प्रकल्प उभा राहत आहे. न्यासाच्या परिसरात सध्या स्वामी भक्तांच्या सेवेत तात्पुरत्या महाप्रसाद गृह बरोबरच श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर (नवसाचा गणपती), नियोजित महाप्रसाद गृह इमारत स्टकचर, कपिला गाय, उभी स्वामी मूर्ती, कारंजा, शिवस्मारक, इनडोर-औटडोर जिम, प्रशस्त वाहन तळ, बालोध्यान शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशामक, रुग्णवाहिका, राज्य परिवाहन महामंडळाच्या चालक व वाहकांना करिता अध्यावत राहण्याची सोय, सौर उर्जा प्रकल्प याबरोबरच विविध दिन उत्सव, पोर्णिमा, चतुर्थी, एकादशी आदी कार्यक्रम न्यास साजरा करते.

⭕चौकट :
सन २०२३-२४ मध्ये ६ महिने पालखी :
गेल्या २६ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. याकाळात सुमारे १८३ दिवसामध्ये १० हजार कि.मी.चा प्रवास सुमारे ५०० गावे महाराष्ट्रातील ३५ जिल्हे व ७५ तालुक्यातून  कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मुक्काम तर गोवा राज्यातील २ जिल्ह्यात मुक्काम पालखीचा असतो. याबरोबरच बृहन मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या महानगरा बरोबरच सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, बुलाढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, नांदेड, अ.नगर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यातून परिक्रमा होत असून विशेष म्हणजे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ राज्यासह गडचिरोली शहर व परदेशातून देखील मागणी होत आहे. पालखी परिक्रमेच्या अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक संतोष भोसले-९८२२८१०९६६, ८५५८८५५६७५  यांना संपर्क करण्याचे आवाहन न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी केले आहे. सदर पालखी परिक्रमा ही ६ महिने महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह दिनांक १२ जून २०२४ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत विसावणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button