गावगाथाठळक बातम्या

Congratulations: कौतुकास्पद ! महाराष्ट्र राज्याला मिळाला यंदाचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याला 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने 2024 चा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील हा पुरस्कार जाहीर झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 जुलैला नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. 

 

यावेळी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ब्राझील, अल्जीरिया, नीदरलॅंड देशाचे राजदूत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड राज्यातील मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. 

महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार शेती संदर्भात सरकारने सुरु केलेल्या नवीन योजना, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सुरु केलेल्या योजनांसाठी दिला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 21 लाख हेक्टरवर बांबू लावण्याचं सर्वात मोठं मिशन हाती घेण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 17 लाख हेक्टरवर कृषी सिंचन पाणी पोहोचण्यासाठी 123 योजना राबवण्यात आल्या आहेत. तसेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची रक्कम दुप्पट करणार महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. नॅनो तंत्रज्ञानद्वारे खतांचे वितरण करण्यासाठी 4.63 लाख शेतकऱ्यांना सरकारने मदत केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button