*अखेर कुरनूर ते सोलापूर बससेवा सुरु*
अनेक दिवसापासून कुरनूर ते सोलापूर अशी बससेवा सुरु करण्याची सातत्याने मागणी कुरनूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून केली जात होती

*अखेर कुरनूर ते सोलापूर बससेवा सुरु*

अनेक दिवसापासून कुरनूर ते सोलापूर अशी बससेवा सुरु करण्याची सातत्याने मागणी कुरनूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून केली जात होती. अखेर या मागणीला यश आले आहे. या बससेवेमुळे शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि प्रवासी यांची सोय होणार आहे. तसेच मराठवाड्यात जाण्यासाठी या बससेवेचा लाभ होणार आहे. आता खेड्यातील विदयार्थ्यांना सोलापुरात शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. ही बस सोलापूर -इटकळ -केशेगाव – निलेगाव -हन्नूर-चुंगी आणि कुरनूर अशी धावणार आहे. यासाठी मा.विनोदकुमार भालेराव-(विभाग नियंत्रक सोलापूर विभाग.)
मा. अजय पाटील-(विभागीय वाहतूक अधिकारी सोलापूर विभाग)
मा.उत्तम जुंदळे-(आगार व्यवस्थापक रा.प.सोलापूर) या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या सुरु झालेल्या बससेवेमुळे कुरनूर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

*बससेवा सुरु झाल्याचे फायदे*

❇️ कुरनूर गावातील लोकसंख्या ही ४५०० असून गावात विद्यार्थी व मजुरांची संख्या खूप आहे. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी सोलापूरला जाणेकरिता अक्कलकोट मार्गे जावे लागते. यामध्ये विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया जातो व त्यांना अक्कलकोट वरुन वेळेत गाडी न मिळाल्यास त्यांचे शेक्षणिक नुकसान होत आहे. सदर बस सेवा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शेक्षणिक नुकसान टळणार आहे.

❇️ कुरनूर येथे बोरी मध्यम प्रकल्प असल्याने बागायतदार शेतक-यांची संख्या जास्त आहे. शेतीत तयार होणारा शेत-माल (भाजीपाला व फळे) विक्रीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नेण्यासाठी दुसरी कोणतेही पर्यायी व्यवस्था नाही. सदर बस सेवा चालू झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी सहकार्य होईल.

❇️ कुरनूर गावची लोकसंख्या ४५०० इतकी असताना देखील गावामध्ये वैद्यकीय सेवा अपुरी आहे. रुग्णांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अक्कलकोटशिवाय दूसरा पर्याय नाही. सदर बस सेवा सुरू झाल्याने रुग्णांना सोलापुरातील चांगल्या व दर्जेदार प्रकारच्या वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे.
❇️ कुरनूर गावातील अनेक कुटुंबाचे पै-पाहुणे व नातेवाईक हे मराठवाड्याकडील आहेत. या लोकांना आपल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी अथवा कार्यक्रमासाठी जाणेकरिता अक्कलकोट वरुन वळसा मारून जावे लागते. सदर बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि आर्थिक नुकसान टळणार आहे.