गावगाथा

प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातील वास्तव गावगाथा दिवाळी अंकाच्या माध्यमातून जगभरात पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत असलेले धोंडाप्पा नंदे यांचं कौतुक ; शिवानंद चौगुले (चिंचवड)

गावगाथा दिवाळी अंक २०२३

प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातील वास्तव गावगाथा दिवाळी अंकाच्या माध्यमातून जगभरात पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत असलेले धोंडाप्पा नंदे यांचं कौतुक ; शिवानंद चौगुले (चिंचवड)

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

📖 #गावगाथा 📚

HTML img Tag Simply Easy Learning    

वाचन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.आपण सतत काहीना काही वाचत असतो.पण वाचन म्हटलं की वर्तमान पत्र, पुस्तके, साप्ताहिक,मासिके आणि खास वर्षातुन एकदा दिवाळीला निघणारे दिवाळी अंक आपल्या समोर येतात. गावगाथा दिवाळी अंकांचे एक वेगळे वलय दिवाळी सणाला लाभलेले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

दिवाळीला नवी कपडे, रोषणाई आणि फराळाबरोबर कथा,कविता,लेख, व्यंगचित्र यांनी भरलेला दिवाळी अंक हवाच. गेल्या शंभरहून अधिक वर्षे दिवाळी सणाचे हे वैशिष्ट्य आपण जपत आलो आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

दिवाळी अंक काढणे हा एक वेडेपणा असतो असे म्हटले जाते.पण खरंतर ते एक साहसही असते.दिवाळी अंक काढणाऱ्या अनेक जणांनी दिवाळी अंक हौस म्हणून,साहित्यावरील प्रेमापोटी म्हणून काढलेले आहेत.खरंतर उत्पन्नाचे स्त्रोत,धंदा म्हणून दिवाळी अंक काढला न जाणे, पदरमोड होणार हे माहीत असुनही त्यात उडी घेणं,एकदा करुन बघायला काय हरकत आहे.असा विचार करत करुन पहाणे हेच या शेकडोनी निघणाऱ्या दिवाळी अंकांचे बलस्थान आणि आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे.दिवाळी अंकांना जाहिराती मिळत नाहीत त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित जुळत नाही हे बरोबरच आहे.

आपणही गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो. त्यामुळे लहान मुलांचे अंक मला मुळातच आवडतात. खरे तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, अगदी जगभरातील सर्वांनाच गोष्टी ऐकायला,वाचायला,सांगायला आवडतात. आज रेडिओ, मोबाईल, टीव्ही अशा वेगवेगळया माध्यमांद्वारेही मुलांना गोष्टीं ऐकवल्या अथवा दाखविल्या जातात पण प्रत्यक्ष गोष्ट वाचण्याची मजा काही वेगळीच असते.
दिवाळी अंक वाचकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ’ संचलित ‘रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालया’सह महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांचा मोठा वाटा आहे.सार्वजनिक ग्रंथालयात दिवाळी अंकाना मोठी मागणी असते.

पोटावर डोकं चालतं किंवा डोक्यावर पोट चालतं.पोटासाठी दिवाळीचा चवदार फराळ आणि डोक्यासाठी दिवाळी अंकांची साहित्यिक मेजवानी दोन्हीचा मस्त संगम घडवून आणणारा दिवाळी हा सण आहे.फराळ तर असणारच ‘गावगाथा’ दिवाळी अंक ही विकत आणुया.

प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातील वास्तव गावगाथा दिवाळी अंकाच्या माध्यमातून जगभरात पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत असलेले धोंडाप्पा नंदे व सहकारी सर्वांना खुप खुप शुभेच्छा!

🌷शुभेच्छुक: शिवानंद चौगुले (चिंचवड)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button