गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: पाणी प्रश्न , शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव यांसारख्या अनेक मागण्या मार्गी लावा ; अन्यथा तीव्र तीव्र आंदोलन छेडण्यात येईल – आनंद बुक्कानुरे -(तालुकाप्रमुख, शिवसेना उबाठा)

अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट विधानसभेतील ऊस नेणाऱ्या सर्व कारखान्याने ऊसाला पहिला उचल तीन हजार रुपये तर अंतिम दर साडेतीन हजार रुपये दिलेच पाहिजे गेल्या वर्षापासून थकलेले कारखानदाराने शेतकऱ्यांना ताबडतोब ऊस बिल द्यावे, सिद्धेश्वर कारखाना जय हिंद कारखाना गोकुळ कारखाना मातोश्री कारखाना ओंकार शुगर सर्व कारखान्याने ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यावरती त्यांचे पैसे जमा करावे, अन्यथा या पुढील काळात प्रत्येक कारखान्यात घुसून पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याची भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली आहे.

करजगी विभागात मंडळ सर्कल मल्लिनाथ सुतार यांनी प्रत्येक शेतकऱ्याचा नोंदणी घ्यायला दहा हजार पेक्षा जास्त पैसे मागत आहे उतारा द्यायला पाचशे ते हजार रुपये मागत आहे याच्यावर ताबडतोब कारवाई करा गेल्या काही वर्षापासुन देगांव कालव्याचे काम रखडले होते”. “आता मात्र त्या कामाला सुरूवात होत आहे”. देगांव कालव्याचे काम पुर्ण झाल्यास शेताच्या बंधाऱ्यावर पाणी सोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे जेऊर, मंगरूळ नागणसुर जिल्हा परिषद गटातील सर्व छोटे-मोठे तलाव देगाव कालव्याच्या पाण्याने भरून घेण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक तलावाला उजनी पाण्याचा जोड देऊन तसेच पावसाळ्यातील भीमा नदी द्वारे वाहून जाणारे पाणी वळवून तालुक्यातील प्रत्येक तलाव भरण्याची प्रशासनानी सूक्ष्म नियोजन करावे. या मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने ठिय्या आंदोलन करून निवेदन तहसीलदार यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला.

 

स्वातंत्र्यापासून अक्कलकोट तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. एक वर्ष पाऊस पडतो तर दोन-चार वर्ष म्हणावा तसा पाऊस पडत नाही. त्यामुळे येथील शेतकरी अनेक संघटना तोंड देत आहे यापुढे तरी शेतकऱ्यांचा नियोजन व्हायला पाहिजे . देगाव एक्सप्रेस कालव्यातुन येणाऱ्या पाण्यांचा नियोजन शासन व प्रशासनाने करण्याची गरज आहे. नागणसूर जिल्हा परिषदमधील नागणसूर, नाविंदगी, गौड़गांव, कडबगांव, उडगी, गळोरगी, तोळणूर, हैद्रा, गुरववाडी, मराठवाडी, बासलेगांव या परिसरात असलेल्या छोटे मोठे तलाव पाण्याने भरून घ्यावा. हे शक्य झाल्यास शेतकऱ्याचा मार्ग सुखकर होणार आहे.

 

कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या भिमानदीचे पाणी हिळ्ळी, खानापूर, आळगी येथे अडविण्यात यावे आणि या ठिकाणी बॅरेज बांधून पंप हाऊस लिप्ट करुन त्या पंप हाऊसद्वारे भीमा नदीचे पाणी अक्कलकोटच्या दक्षिण भागातील तलावात सोडण्यात यावे. तसेच कुरनूर धरणात सोडण्यात येणाऱ्या उजनी धरणाचे पाणी चपळगाव, सलगर,वागदरी,मैदर्गी, दुधनीअक्कलकोट शहर परिसरातील तलावात पाणी सोडण्यात यावे. ते भरून घ्यावे. हे शक्य झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रगती होण्यास मदत मिळेल.

या सर्व मागणीचा गांर्भीयपुर्वक विचार करुन या सर्व शेतकच्यांच्या मागण्यावर येत्या महिनाभरात पर्यंत सकारात्मक तोडगा निघावा. तसे न झाल्यास शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने संबधित सर्व पीडीत शेतकन्यांना सोबत घेऊन जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संपर्कप्रमुख उमेश सारंग यांच्या सूचनेनुसार तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली आणखीन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिनाथ भासगी तालुका संघटक शरण सुरवसे शेतकरी सेना महांतेश हत्तुरे , उपतालुकाप्रमुख शांतवीर कळसगुंडा श्रीशैल स्वामी गुरुनिंगप्पा पाटील संतोष पाटील सिद्धाराम बिराजदार शहर प्रमुख मल्लिनाथ अरवतकल सिद्धाराम गुब्याड इतर पदाधिकारी बसवराज पुजारी मल्लिनाथ कल्याण, श्रीशैल धनशेट्टी स्वामीनाथ प्रचंडे नितीन मोरे मंजुनाथ हडपद बोळेगाव वाघमारे सुनील धर्मशाले नागू शिंदे इलाई पटेल सागर सुरवसे सह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button