तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री शंकरलिंग प्रशालेस प्रथम क्रमांक
मुख्याध्यापक विरेश थळंगे, पर्यवेक्षक शिवानंद घोडके व इतर सर्व शिक्षकांनी अभिनंदन करुन जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरिता शुभेच्छा दिले.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री शंकरलिंग प्रशालेस प्रथम क्रमांक

वळसंग .(ता..द.सोलापूर)
*पंचायत समिती दक्षिण सोलापूर आणि एस . व्ही .सी.एस.हायस्कूल बोरामणी यांच्या वतीने ५१वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बोरामणी येथे आयोजित करण्यात आले होते .या प्रदर्शनात प्राथमिक गटातून मांडण्यात आलेल्या उपकरणांपैकी श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला वळसंग मधील कुमारी साईगंधा तानाजी जमादार हिच्या रेल्वे अपघात प्रतिबंध या उपकरणाला तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला असून सदर उपकरणाची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरिता झाली आहे.या यशस्वी विद्यार्थिनीस विज्ञान विभागातील शैला निंबाळ, बाळकृष्ण गुंड, संजयकुमार धनशेट्टी,सिध्दारुढ हिरेमठ, विजय प्याटी, विजयालक्ष्मी थळंगे, सिध्दाराम भैरामडगी कलाशिक्षक अजय माणकोजी , इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आई शैलजा जमादार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर यशस्वी विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष श्रीशैल दुधगी, चेअरमन शिवशरण थळंगे, संचालक विश्वनाथ थळंगे,प्रकाश दुधगी, शिवशरण प्याटी, रमेश दुधगी,ईरेश यागंटे, मुख्याध्यापक विरेश थळंगे, पर्यवेक्षक शिवानंद घोडके व इतर सर्व शिक्षकांनी अभिनंदन करुन जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरिता शुभेच्छा दिले.💐💐💐💐💐💐💐💐💐
