*शिक्षकेत्तर कर्मचारी राज्य कार्यकारिणीच्या सचिव पदी दत्तू गडवे यांची निवड*
निवड नियुक्ती

*शिक्षकेत्तर कर्मचारी राज्य कार्यकारिणीच्या सचिव पदी दत्तू गडवे यांची निवड*

उमरगा दि. २९ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या कार्यकारी मंडळाची सर्वसाधारण सभा दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी के. एम. आग्रवाल महाविद्यालय, कल्याण येथे पार पडली. सदरील कार्यकारी मंडळात विभागवार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
सदर कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाच्या सचिव पदी मुरुम जि. धाराशिव येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील दत्तू विठ्ठलराव गडवे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे.

यावेळी राज्य कार्यकारीनीच्या अध्यक्ष पदी अकोला येथील रा. जा. बढे, सरचिटणीस पदी कल्याण येथील डॉ. आर. बी. सिंह, कार्याध्यक्ष पदी पुणे येथील शशिकांत कामठे व कोषाध्यक्ष पदी कल्याण येथील अनिल लबरे यांची फेर निवड करण्यात आली तर नांदेड येथील गोविंद जोशी यांची कार्याध्यक्ष पदी सर्वानुमते नविन निवड करण्यात आली.

तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाच्या उपाध्यक्ष पदी, नळदुर्ग जि. धाराशिव येथी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे श्री धनंजय पाटील, सचिव पदी मुरुम जि. धाराशिव येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील दत्तू विठ्ठलराव गडवे, सहसचिव पदी जालना येथील विजय गौड, विभागीय सचिव पदी बीड येथील महारुद्र शेळके, महीला संघटक पदी कळंब येथील सारिका पडवळ, प्रमुख सल्लागार पदी बीड येथील राजकुमार काळे, तर सदस्य पदी संभाजीनगर येथील विनय कुलकर्णी, जालना येथील राजेंद्र ठोबरे व सभाजीनगर येथील सत्यवान माळी यांची निवड करण्यात आली.
