निवड /नियुक्ती

*चर्मकार ऐक्य परिषदेच्या अध्यक्षपदी संजय खामकर तर महासचिवपदी चंद्रप्रकाश देगलूरकर*

चर्मकार ऐक्य परिषदेची पुढील राज्यस्तरीय बैठक येत्या रविवार दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृह, उदगीर जि. लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे

*चर्मकार ऐक्य परिषदेच्या अध्यक्षपदी संजय खामकर तर महासचिवपदी चंद्रप्रकाश देगलूरकर*
परभणी (प्रतिनिधी) : चर्मकार ऐक्य परिषदेच्या परभणी येथे आयोजित राज्यस्तरीय बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन राज्य कार्यकारिणीची निवड घोषित करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी अहमदनगर येथील संजय खामकर तर महासचिवपदी नांदेड येथील इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची बहुमतांनी निवड करण्यात आली.
लोकमान्य नगर परभणी येथील धाडवे निवास सभागृहात चर्मकार ऐक्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष रविकिरण घोलप (नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली चर्मकार ऐक्य परिषदेची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर सांगोपांग चर्चा करुन कांही ठोस निर्णय घेण्यात आले. समाजावरील वाढत्या अन्याय अत्त्याचारांच्या विरोधात आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली.
आपला तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे रविकिरण घोलप यांनी चर्मकार ऐक्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर लोकशाही पद्धतीने नविन राज्य कार्यकारिणीची निवड घोषित करण्यात आली, त्यानुसार अध्यक्षपदी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर तर महासचिवपदी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची बहुमतांनी निवड घोषित करण्यात आली. तसेच गुरु रविदास विश्व महापिठाचे प्रदेशाध्यक्ष लाॅ. वसंतराव धाडवे (वाशिम) यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी फेरनिवड जाहिर करण्यात आली. कोषाध्यक्षपदी राष्ट्रीय चर्मकार संघाचे रामभाऊ कदम (मुंबई) यांची निवड जाहिर करण्यात आली.
सर्वप्रथम गुरु रविदासांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन बैठकीची सुरुवात करण्यात आली. बैठकीचे संयोजक लाॅ. वसंतराव धाडवे यांनी प्रास्ताविक केले तर गजानन मुडे यांनी सुत्रसंचलन केले. बैठकीत राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक मा. आ. बाबुराव माने (मुंबई), गुरु रविदास चर्मकार महासंघाचे संस्थापक लक्ष्मणराव घुमरे (बुलडाणा), बहुजन समाज जागृती विकास संघाचे अध्यक्ष गोविंदराव खटावकर (मिरज), संत रविदास सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल व्हनमारे (सोलापूर), शिवाजी लकवाले (उदगीर), व्यंकटराव दुधंबे (नांदेड), ॲड. नारायण गायकवाड (मुंबई), गोपिनाथ गाडे (आष्टी) आदींनी आपले विचार मांडले.
बैठकीस राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम इंगोले (मुंबई), अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजीराव जमदाडे (परभणी), रविदास फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष मराठे (मुंबई), दिनेश देवरे (अहमदनगर), महाराष्ट्रीय चर्मकार संघर्ष संघटनेचे अध्यक्ष महेंद्र अहिरे (नाशिक), सकल चर्मकार महासंघाचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल भानुसे (लोणार), प्रा. प्रविण करनाडे (परभणी), बाबुराव वाघमारे (लातूर) आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संत रविदास सामाजिक संघटना सोलापूरचे सर्वश्री धोंडीबा वंजारे, शिवलाल हरळेकर, श्रीनिवास धुळगुंडे, चर्मकार विकास संघ अहमदनगरचे संदिप डोळस, रुपेश लोखंडे, गुरु रविदास संघटना मिरजचे अप्पासाहेब क्रांतीकर, अमोल भोसले (सांगली), गुरु रविदास चर्मकार महासंघाचे गजानन उंबरकर, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रमेश सुरभैये, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल उकंडे, दक्षिण जिल्हाध्यक्ष गंगाधर गंगासागरे, कर्मचारी परिषद जिल्हाध्यक्ष भीमराव वाघमारे, जिल्हा संघटक नारायण वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष शिवराज कांबळे, जिल्हा महासचिव प्रकाश कामळजकर, युवा कार्यकर्ते विनोद गंगासागरे, पूर्णा तालुकाध्यक्ष चांदोजी कांबळे, वसमत तालुक्यातील माळवटा येथील रविदास संस्थानचे केरबा कसारे, परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप अस्वार, महेश अंबेकर, गोपिचंद गुरव, अंकुश जोगदंड, भीमराव ठोंबरे, तुकाराम गायकवाड, वामनराव वाढे, पुष्पक देशमुख, दिपक हातागळे, कैलाश इनकर, रमेश लख्खे, रामप्रसाद मोताळे, महेश कुदमुळे आदींची यावेळी उपस्थिती होती. शेवटी डाॅ. प्रविण धाडवे यांनी आभार मानले.
*उदगीर येथे ५ नोव्हें. रोजी बैठक*
चर्मकार ऐक्य परिषदेची पुढील राज्यस्तरीय बैठक येत्या रविवार दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृह, उदगीर जि. लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे, त्यावेळी उर्वरित कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. युवक आणि महिला आघाडीची देखिल उदगीर येथे निवड करण्यात येईल.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button