जागतिक लिंगायत महासभा दक्षिण सोलापूर तालुका कार्यकारिणी बैठकीत: तालुका अध्यक्षपदी डॉ बसवराज नंदर्गी यांची निवड
पंचक्रोशीतील बहुसंख्य लिंगायत बांधव उपस्थित होते.बैठक संपल्यानंतर सर्व मान्यवरांनी संगमेश्वराचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231127-WA0042-780x470.jpg)
जागतिक लिंगायत महासभा दक्षिण सोलापूर तालुका कार्यकारिणी बैठकीत: तालुका अध्यक्षपदी डॉ बसवराज नंदर्गी यांची निवड
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान कूडल ता.द.सोलापूर येथे जागतिक लिंगायत महासभा दक्षिण सोलापूर तालुका कार्यकारिणी गठित करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती.बैठकीची सुरुवात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी एम .के.फांऊडेशन चे अध्यक्ष श्री महादेव कोगनूरे साहेब होते.यावेळी श्री मल्लिकार्जुन मुलगे यांनी लिंगायत धर्मातील अष्टावरण,पंचाचार,षट्स्थल इ.ची माहिती दिली.जिल्हाध्यक्ष श्री शिवानंद गोगाव सरांनी संघटन शक्तीचे महत्व विशद केले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
राज्य समन्वयक श्री विजयकुमार हत्तूरे यांनी लिंगायतांनी संघटीत होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.या बैठकीत दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी डॉ बसवराज नंदर्गी यांची यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली.त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम मी आपल्यासोबत असल्याचे श्री महादेव कोगनूरे साहेब यांनी सांगितले.या बैठकीस लिंगायत समन्वय समितीचे कार्यवाहक श्री विजयकुमार हत्तूरे साहेब, जागतिक लिंगायत महासभा राज्य जनरल सेक्रेटरी श्री मल्लिकार्जुन मुलगे, सोलापूर जिल्हा जागतिक लिंगायत महासभा अध्यक्ष श्री शिवानंद गोगाव सर,उपाध्यक्ष श्री शिवशरण गोविंदे,शिवराज कोटगी, बाबूराव पाटील,धर्मराज बिराजदार,सेक्रेटरी शिवानंद बाहेरमठ,जनरल सेक्रेटरी श्री धोंडप्पा तोरणगी,कोषाध्यक्ष श्री नागेंद्र कोगनूरे , घाळय्या स्वामी, शांततेश्वर कोठे जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ.राजश्री थळंगे अक्का, सौ.बहिरमठ अक्का व वांगी,लवंगी,हत्तरसंग,कूडल आणि पंचक्रोशीतील बहुसंख्य लिंगायत बांधव उपस्थित होते.बैठक संपल्यानंतर सर्व मान्यवरांनी संगमेश्वराचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)