गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ भक्तसेवेने सजलेला धार्मिक प्रेरणेचा प्रवास

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे भक्तसेवेने सजलेले आणि धार्मिक प्रेरणा देणारे सक्षम कार्यक्षेत्र आहे, असे गौरवोद्गार राज्य विद्युत नियामक आयोगाचे सदस्य तथा राज्याचे माजी गृहसचिव आनंद लिमये (आयएएस) यांनी काढले.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या माध्यमातून सुरू असलेल्या भक्तसेवेचे त्यांनी कौतुक केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

आनंद लिमये हे सहकुटुंब श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास भेट देण्यासाठी आले होते. यावेळी पुरोहित संजय कुलकर्णी यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची प्रतिमा व कृपावस्त्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत इले. इंजि. श्रीनिवास साठे हे सहपरिवार उपस्थित होते. त्यांचाही न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

याप्रसंगी एस. के. स्वामी, सिद्धाराम कल्याणी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, नवनीत पाटील, राजू पवार, प्रसाद हुल्ले, दत्ता माने, तानाजी पाटील, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, रोहित कदम, धनंजय निंबाळकर, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button