हैद्रा येथील ग्रामदैवत हिंदू-मुस्लीम ऐकयाचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा हाजी सैफुल मुलुक चिस्ती कादरी रह. हैद्राशरीफ यांच्या यात्रेस (८९० वा ऊर्सास) शुक्रवार पासून सुरुवात
हैद्रा यात्रेस (८९० वा ऊर्सास) शुक्रवारपासून सुरुवात
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231205-WA0056-525x470.jpg)
हैद्रा यात्रेस (८९० वा ऊर्सास) शुक्रवारपासून सुरुवात
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट:- (सोहेल फरास) अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील ग्रामदैवत हिंदू-मुस्लीम ऐकयाचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा हाजी सैफुल मुलुक चिस्ती कादरी रह. हैद्राशरीफ यांच्या यात्रेस (८९० वा ऊर्सास) शुक्रवार पासून सुरुवात होत आहे. यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान दर्गा कमिटीचे चेअरमन जनाब मिरासाब बाबूलाल याकुबसाब मुजावर व व्हा.चेअरमन रफिक शिराजोद्दिन मुजावर यांनी केले आहे.
♦️शुक्रवार दि.८ डिसेंबर रोजी मानाचा संदल (गंध)पाटील यांच्या घरातून(करजगी कर्नाटक) येथून निघून शनिवारी पहाटे सात वाजता गंध माली (संदल चढवण्यात येते) होतो.
♦️शनिवार दि.९ डिसेंबर रोजी चिरांगा (दिवेबत्ती) बाद इशा रात्री ०८:०० वाजता, चिराग दिवे बती साठी हैद्रा परिसरातील सात गावातून गावच्या पाटलांकडून दिव्या भरतीसाठी तेल येतो त्या तेलातूनच दिवे लावण्यात येते (चिराग रोशन किया जाता है)
♦️रविवार दि.१० डिसेंबर रोजी जियारत (प्रसाद वाटप) होणार आहे. तसेच ८ डिसेंबर व ९ डिसेंबर रोजी महिफिले समाचा (लातूर) आयोजन दर्गा परिसरात करण्यात आला आहे. व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेस पंचक्रोशीतील अक्कलकोट तालुक्यासह मुंबई पुणा कर्नाटक आंध्रप्रदेश व पर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान दर्गा कमिटीचे व्हा.चेअरमन रफिक शिराजोद्दिन मुजावर यांनी केले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फरास सोहेल
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)