विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नछत्र हे श्री स्वामींची कृपादृष्टी पारनेर आमदार निलेश लंके
उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नछत्र हे श्री स्वामींची कृपादृष्टी पारनेर आमदार निलेश लंके
🔶अक्कलकोट* : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नछत्र हे श्री स्वामींची कृपादृष्टी असल्याचे मनोगत पारनेर (जिल्हा अ.नगर) चे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत दिलिप सिद्धे, अनिल घुले, संदीप शिंदे, शिवराज स्वामी, मेनुद्दीन कोरबू, अविराज सिद्धे, श्रीशैल चितली, धोंडप्पा मुलगे, अविनाश पवार, सुनील साठे, धनंजय मचाले, रणजितसिंह जाधव, कुणाल भालेकर, माया जाधव, महेश स्वामी, स्वराज्य घाडगे, नंदू स्वामी हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, दत्ता माने, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, चंदू हिबारे, प्रमोद सलबत्ते, धानु उमदी, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
