गावगाथा

वाढीव भाव न मिळाल्यास सौर ऊर्जेचे काम बंद करू सरपंच चिदानंद उण्णद  कोन्हाळी

तहसीलदारांना निवेदन सौर ऊर्जा प्रकल्पाचे वाढीव भाव मिळावे : सरपंच चिदानंद उण्णद

तहसीलदारांना निवेदन सौर ऊर्जा प्रकल्पाचे वाढीव भाव मिळावे : सरपंच चिदानंद उण्णद

HTML img Tag Simply Easy Learning    

वाढीव भाव न मिळाल्यास सौर ऊर्जेचे काम बंद करू सरपंच चिदानंद उण्णद  कोन्हाळी

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट – राज्यात सर्वत्र सौर ऊर्जेसाठी शासनाने एकरी पन्नास हजाराचे भाव निश्चित केले असताना अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना फसवून तीस हजाराने सौर कंपनीने भाडेकरार केले आहे.
भाडे करारात शेतात बांधकाम करणे,झाडे तोडणे,बांध तोडणे,माती उचलणे या कामास मनाई असताना सौर ऊर्जा कंपनीने रातोरात बेकायदेशीर बांधकाम करणे,झाडे तोडणे,बांध नष्ट करणे आणि वृक्ष तोडणे असे प्रकार चालू केले आहेत.ते काम बंद करण्यासाठी हसापूर, कोन्हाळी ,बागेहळ्ळी , या भागातील बाधित शेतकऱ्यांनी शेतकरी नेते स्वामीनाथ हरवाकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन अप्पर तहसीलदार श्रीकांत कांबळे यांना निवेदन दिले. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर तूर्तास काम थांबवण्याचे आदेश पोलीस आणि तहसीलदारांनी संबंधित ठेकेदारांना दिले आहे.रात्री अपरात्री विनापरवाना उर्जा कंपनीचे ठेकेदार चोरून काम करत असल्याचे दिसून आल्यास ते काम बंद पाडण्यासाठी या भागात शेतकऱ्यांची रात्रीची गस्त सुरू केली आहे.
सरपंच चिदानंद उन्नद,आणि इंदुबाई माशाळे यांनी याबाबत आपल्या ग्रामपंचायतीत ठराव करून विरोध केला आहे.निवेदन देताना मनोज शिंदे,संतोष मुरडे,तानाजी मोरे,बाबा सुरवसे,काशिनाथ राऊत यासह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

……

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button