गावगाथा

वागदरी जि.प.मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली सरपंच शिवानंद घोळसगांव यांची घेतलीं मुलाखत…,

चावडीवाचन व सरपंच मुलाखत मुख्याध्यापिका सौ .रेखा सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जि .प .प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यानी ग्रामपंचायत मध्ये घेतली

वागदरी जि.प.मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली सरपंच शिवानंद घोळसगांव यांची शाळा.,

चावडीवाचन व सरपंच मुलाखत मुख्याध्यापिका सौ .रेखा सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जि .प .प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यानी ग्रामपंचायत वागदरी ता .अक्कलकोट जि .सोलापूर समोर सरपंच शिवानंद घोळसगाव व मा .सरपंच श्रीकांत भैरामडगी यांच्या उपस्थितीत चावडीवाचन घेण्यात आले .विद्यार्थ्यानी क्रमिक पुस्तके व गोष्टी ची पुस्तके यांचे वाचन केले .धाडसाने सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांच्यासमोर वाचन करताना गावकरी कुतुहलाने बघत होते .विद्यार्थ्याना हा प्रसंग कायम लक्षात राहिल कारण हा वेगळा अनुभव त्यांनी घेतला व अनुभवला . वागदरी गावचे विद्यमान सरपंच श्री .शिवानंद घोळसगाव यांच्या केबिनमधे विद्यार्थ्याना बसवुन ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो यावर विद्यार्थी आणि सरपंच यांच्यात चर्चा घडवुन आणली .ग्रामपंचायत काय कामे करते या प्रश्नाचे उत्तर देताना सरपंच शिवानंद घोळसगाव यांनी सांगितले की पाण्याची व्यवस्था लाईट रस्ते गटार गाव स्वच्छता इत्यादी कामे ग्रामपंचायत करत असते .गावचा विकास करण्याचे काम करते असे सरपंचानी सांगितले .विविध प्रश्न विद्यार्थ्यानी विचारले आणि शिवानंद घोळसगाव सरपंच व श्रीकांत भैरामडगी माजी सरपंच यांनी समजेल अश्या भाषेत विद्यार्थ्याना समाधानपूर्वक उत्तरे दिली आणि त्यांनीही विद्यार्थ्याना प्रश्न विचारली .अगदी छानपद्धतीने सरपंच मुलाखत झाली .हा अनुभव विद्यार्थ्याना अगदी नवीनच होता .ग्रामपंचायतीमधे कधीच न गेलेली .ग्रामपंचायत कशी असते ऑफीस कसे असते बैठक व्यवस्था कामकाज याबद्दल कुतुहलाने विचारणारे व पाहणारे विद्यार्थी यांना खूपच आनंद व समाधान झाले .मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंचाचे आभार मानले .महत्वाची कामे असतानाही मुलाखत देणे माहिती सांगणे विचारणे यासाठी वेळ दिला .गावात ग्रामपंचायत काय काय कामे करते याविषयी माहिती सांगितली .विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले .चावडी वाचन घेत असताना सहकार्य केले .विद्यार्थ्याचे वाचन घेऊन कौतुक व अभिनंदन केले .सरपंच शिवानंद घोळसगाव माजी सरपंच श्रीकांत भैरामडगी सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी यांचेपण आभार जि .प .प्राथमिक मराठी शाळा वागदरीच्या वतीने मानण्यात आले .यावेळी अनुसया कलशेट्टी मनिषा कुणा ळे उपस्थित होत्या .चावडीवाचन व सरपंच मुलाखत रत्नाबाई रेऊरे तोलन बागवान यांचे सहकार्य लाभले .

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button