गावगाथा

उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बोटीतून पर्यटक सफर, ग्रामीण पर्यटन वाढीला मोठा वाव.

उजनी बॅकवॉटर परिसरातील पाणी उथळ असताना हा किल्ला उघडा पडतो. त्यावेळी महाराष्ट्रातील शिवप्रेमी व पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेटी देतात.

उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बोटीतून पर्यटक सफर, ग्रामीण पर्यटन वाढीला मोठा वाव.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

उजनी बॅकवॉटर परिसरातील तिन्ही बाजूने साधारण २५ किलोमीटर पाण्याने वेढलेल्या हनुमान जन्मभूमी कुर्मग्राम पंचक्रोशीत पर्यटनाला प्रचंड मोठा वाव आहे. या परिसरातील कुगाव, चिखलठाण १ व चिखलठाण २ या गावातील बेरोजगार युवक युवतींना गावातच रोजगार उपलब्ध होईल. परिसराचा महाराष्ट्रातील कोकण, भारतातील गोवा किंवा केरळ प्रमाणे विकास करणे गरजेचे आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

हनुमान जन्मभूमीतील बेरोजगार युवकांनी हनुमान जन्मभूमीत येण्यासाठी खाजगी स्तरावर साधारण १२ बोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या इंदापूर तालुक्यातील गंगावळण, कळाशी, कालठण, शिरसोंडी व पडस्थळ या ठिकाणाहून या परिसरात येण्यासाठी बोटिंगची व्यवस्था आहे. बोटिंगच्या माध्यमातून दरवर्षी साधारण दोन कोटी च्या आसपास उलाढाल होत आहे. येत्या काळात या परिसरात पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व स्थानिक बेरोजगार युवकांना गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे

HTML img Tag Simply Easy Learning    

.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने सकारात्मक पावले उचलली पाहिजेत, या परिसराला प्रचंड मोठा पौराणिक वारसा लाभला आहे. भीमामहात्म्य या पौराणिक ग्रंथातील अध्याय ३३ नुसार हनुमानाचा जन्म याच परिसरात झाला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांनी हनुमान जन्मभूमी कुगाव (ता. करमाळा) येथे भुईकोट किल्ला बांधला आहे. सध्या या ठिकाणाला उजनी धरणाच्या निर्मितीनंतर जलसमाधी लाभली आहे. परंतु उजनी बॅकवॉटर परिसरातील पाणी उथळ असताना हा किल्ला उघडा पडतो. त्यावेळी महाराष्ट्रातील शिवप्रेमी व पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेटी देतात.

प्रस्तावित जलहवाई सेवा लवकरच या परिसरातील कालठण (ता. इंदापूर) या ठिकाणी सुरू होणार आहे. पर्यटन वाढीबाबत चालना मिळवून देण्यासाठी गंगावळण (ता. इंदापूर) या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अद्ययावत गेस्ट हाऊसचे काम पूर्ण केले जात आहे.

छाया- नासीर कबीर

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button