*IMPACTअक्कलकोट वागदरी रस्त्याचे पेविंग चे काम सुरु*
अक्कलकोट वागदरी ह्या रस्त्याच्या टेंडरला सेंटर मधून लवकर परवानगी न मिळाल्याने कामाला उशीर झाला आहे. खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले असून, आता पेविंग चे चालू झाले आहे. येत्या आठवड्याभरात या महामार्गचे पेविंग सह काम पूर्ण होईल.

*IMPACTअक्कलकोट वागदरी रस्त्याचे पेविंग चे काम सुरु*

✒️ *प्रविणकुमार बाबर /सांगवी बु*


अक्कलकोट दि :- 12 तालुक्यातील वागदरी रस्त्यावर डांबर उखडून खड्डे पडल्याने वाहनचालकांना यांचा नाहक त्रास होत होता याच विषयाला धरून दैनिकांत बातमी प्रसिद्ध होताच राष्ट्रीय महामार्ग विभाग खडबडून जागे झाले व तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली असून,विशेष धक्कदायक बाबा म्हणजे सांगवी बु येथील पुलाच्या दुभाजकाला भला मोठा भगदाड पडला होता. हा पूल संपताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला भले मोठे खड्डे पडलेले लांबून वाहन चालकाच्या निदर्शनास येत नाहीत पण गाडी जवळ जाताच हे खड्डे दिसतात अचानक पणे गाडी कंट्रोल करणे हे वाहन चालकांना धोक्याचे ठरत होत होते. दोन दिवसापूर्वी दुचाकीस्वार ला हा खडा न दिसल्याने गाडी खड्ड्यात गेली व हे दोघे पडले आणि त्यामध्ये निमगाव येथील रहिवासी बियामा चांद शेख वय -53 ह्या गंभीर झाले होते पण दोन दिवसाच्या उपचारा दरम्यान त्या जखमी महिलेचे निधन झाले.
अक्कलकोट वागदरी हा रस्ता सा बा विभागाच्या आखतरीत होता पण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्याकडे हस्तातरीत करण्यात आला आहे. या विभागाच्या ठेकेदार व अधिकाऱ्यानी या गंभीर बाबीकडे डोळेझाक करीत होते. पण दोन दिवसापासून सतत बातम्या झळकल्या आणि महामार्ग खाते तात्काळ कामाला लागले. व गेल्या आठवड्यात किरकोळ खड्डे बुजवून घेऊन आता आज पासून (पेवर ) पेविंग चे पण काम सुरुवात केले असून वागदरी पासून या कामाची सुरवात झाली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी यांनी दिली
अक्कलकोट वागदरी राष्ट्रीय राज्य महामार्ग हा रस्ता कर्नाटक व मराठावाडा यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा महामार्ग समजला जात आहे.
—————————————-
चौकट :- अक्कलकोट वागदरी ह्या रस्त्याच्या टेंडरला सेंटर मधून लवकर परवानगी न मिळाल्याने कामाला उशीर झाला आहे. खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले असून, आता पेविंग चे चालू झाले आहे. येत्या आठवड्याभरात या महामार्गचे पेविंग सह काम पूर्ण होईल.

➡️ किरण हबीब, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सोलापूर
