Akkalkot: शाळेच्या आवारात चालतो ग्रामपंचायतीचा कारभार ; अक्कलकोट तालुक्यातील या गावात ग्रामपंचायत कार्यालयच नाही… कारभार उघड्यावरच….

दुधनी (प्रतिनिधी ): अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेले दुधनी येथील गांधी नगर ( सोळसे लमाण तांडा) हि स्वतंत्र ग्रामपंचायत दि23-6-2023 रोजी नविन स्थापन झालेली असून या ग्रामपंचायत मध्ये शिवाजी नगर तांडा , भिमनगर , म्हेत्रे तांडा 1 व 2 व गांधी नगर (सोळसे लमाण तांडा) इत्यादींचा समावेश आहे .अद्याप ग्रामपंचायतीचे कामकाज शाळेच्या आवारात तर कधी झाडाच्या सावलीत ग्रामपंचायत अधिकारी काम पाहताना दिसत आहे.

स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली. चार्ज मिळताच सहा महिन्यापासून ग्रामपंचायत अधिकारी कामकाज पाहत असून ग्रामपंचायत कार्यालय असणे गरजेचे असताना देखील गांधी नगर ग्रामपंचायत चे अधिकारी उघड्यावर ग्रामपंचायतीचे कामकाज करत आहे.

तरी प्रशासनाने त्वरीत लक्ष्य घालून ग्रामपंचायत कार्यालय उपलब्ध करून द्यावे त्याचबरोबर पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक पातळीवर रहिवाशीतून होत आहे

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी नागनाथ सोरेगांव,नागेश कलमनी ,श्रीमंत कोटनूर ‘महांतेश चव्हाण, विश्वनाथ राठोड आदी उपस्थित होते .

नागरिकांना अडचणी येऊ नये म्हणून मिळेल त्या ठिकाणी बसून कामकाज करीत आहोत. ग्रामपंचायत कार्यालय मंजूरीसाठी प्रस्ताव सादर असून, लवकरच वरीष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल.
-नागनाथ सोरेगांव, ग्रामपंचायत अधिकारी