गावगाथा

*नागणसूर तुपाच्या मठात भाविकांची अलोट गर्दी… *48 जोडपे झाले विवाह बद्द ; 11 हजारा हून अधिक महिलांनी घेतला सुहासिनीचा मान..!!*

*7 हजार जंगम गणराधना..!!!*

*नागणसूर तुपाच्या मठात भाविकांची अलोट गर्दी…
*48 जोडपे झाले विवाह बद्द ; 11 हजारा हून अधिक महिलांनी घेतला सुहासिनीचा मान..!!*

HTML img Tag Simply Easy Learning    

*7 हजार जंगम गणराधना..!!!*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

*🔶अक्कलकोट : (प्रतिनिधी)
*तालुक्यातील नागणसूर येथील महिमा पुरुष व गावच्या रक्षणासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारे जगद्गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या तुपाच मठात त्यांच्या 91 व्या पूण्यस्मरणोत्सवा निमित्त दर्शनासाठी भाविकांचा जनसागरच लोटला होता.*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

श्रीगुरु बसवलिंग महास्वामीजींच्या आघात महिमा लहान मुलापासून अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वांनी त्यांना तन,मन,धनाने सेवा करतात. नवस मागून घेतलेल्या भाविकांनी वेगवेगळ्या पद्धतीने नवस फेडण्याची पद्धत समजते जसे सकाळपासून नव्हे रात्रभर गावातील महिलांनी पुरणपोळी करून श्री मठात जमा करतात, युवक मंडळी अगदी रस्ता स्वच्छते पासून स्वयंपाक, ताट धुण्यापर्यंत सेवा करतात.

एवढेच नव्हे तर सकाळपासून नागणसूर व परिसरातील भाविकांनी तुपाची घागरी घेऊन वाजत गाजत मठात अर्पण करतात, एका भाविकांनी तर एक किलोमीटर वरून लोटगण्या घालत आपली सेवा पोचवले, हे महास्वामीजीच्या आघात शक्तीचे परिणाम दिसून येते. आज सकाळी हिमालय योगी मनिप्र अभिनव बसवलिंगेश्वर महास्वामीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी 11 हजार हून अधिक महिलांनी घेतला सुहासिनीचा मान, व 7 हजार जंगम गणराधना, सुहासिनी ओटी भरण्याचे कार्यक्रम संपन्न झाले. नंतर गदगचे परमपूज्य कल्लय्यज्जा, पुण्याचे अशोक तोडमल, श्रीमती शारदा आणि धारवाडचे रमेश कुरबगट्टी यांना श्री जगद्गुरु ‘बसवलिंग रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचवेळी श्री परमपूज्य कल्लय्यज्जा यांचे तुलाभार कार्यक्रम करण्यात आले.

याप्रसंगी हिमालया योगी पूज्य डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामी, करजगीचे पूज्य शिवानंद महास्वामी, तोळणूरचे पूज्य चन्नमल्ल महास्वामीजी, खेडगीचे पूज्य शिवबसवराजेंद्र महास्वामीजी,  रोडगीचे पूज्य अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी, शिरवळचे पूज्य सोमलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात 48 जोडप्यांना विवाहबद्ध करून रेशीम गाठी बांधण्यात आले.

या कार्यक्रमासाठी परगावाहून येणार्‍या भक्तांकरिता पंचक्रोशीतील चालक-मालक संघटनेच्या वतीने गेल्या सतरा वर्षापासून मोफत वाहन सेवा करण्यात येत आहे. सायंकाळी श्री गुरू बसवलिंगेश्वर सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने संगीतसंजे कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाकरिता गावातील नोकरदार वर्गाने एक महिन्याचे वेतन देऊन सेवा रुजवली आहे.

यावेळी सर्व पुरस्कर्त्यासह परिसरातील गावच्या मठाचे मठाधिपती यांच्यासह अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, नितीन ननावरे, महेश हिंडोळे, प्रदिप पाटील, कांतू धनशेट्टी, सोमशेखर जमशेट्टी, अशपाक बळोरगी, शिवराज स्वामी, डॉ. शिवशरणप्पा दामा, डॉ. सुनिल हंद्राळमठ, संजय शरणार्थी यांच्यासह आदीजण उपस्थित होते. शनिवार दि. 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता श्रींची भव्य फोटो व वचनाग्रंथ मिरवणूक कार्यक्रम होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp Group