गावगाथा

*चंपाषष्ठी निमित्त श्री स्वामींचे आगमस्थान असलेल्या संस्थांनकालीन खंडोबा मंदिरात अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते पूजा संपन्न..*

अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले राजेसाहेब अक्कलकोट यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली . यावेळी मंदिराचे पुजारी श्रीशैल गुरव हे उपस्थित होते.....

*चंपाषष्ठी निमित्त श्री स्वामींचे आगमस्थान असलेल्या संस्थांनकालीन खंडोबा मंदिरात अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते पूजा संपन्न..*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट संस्थान : ……………….
अक्कलक्कोट संस्थानचे अधिपती कै. श्रीमंत शहाजीराजे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई राणीसाहेब नेहमी पंढरपूर, तुळजापूर व जेजुरी आदी तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करीत असत. त्यातल्या त्यात त्यांची जेजुरीच्या खंडेरायावर विशेष श्रद्धा होती. एकदा त्यांच्या मनात आले की, श्री खंडेरायाचे दर्शन आपणाला सदैव व सहज व्हावे, म्हणून अक्कलकोट येथेच एक श्री खंडेरायाचे मंदिर बांधावे. त्याप्रमाणे एकदा जेजुरीवरून येताना त्यांनी श्री खंडेराया, श्री म्हाळसा व श्री बाणाबाई अशा तीन मूर्ती बरोबर आणल्या. अक्कलकोट येथे निसर्गरम्य अशा ठिकाणी हे सध्याचे छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली.

HTML img Tag Simply Easy Learning    


मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठीपर्यंत नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो. आज मार्गशिष मास चंपाषष्ठी निमित्त अक्कलकोट संस्थानाचे अधिपती कै.श्रीमंत शहाजीराजे यांच्या धर्मपत्नी कै.श्रीमंत लक्ष्मीबाई राणीसाहेब स्थापित व श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमस्थान श्री खंडोबा मंदिरात आज अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले राजेसाहेब अक्कलकोट यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली . यावेळी मंदिराचे पुजारी श्रीशैल गुरव हे उपस्थित होते…..

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button