गावगाथा

स्वामी भक्तीच माझ्या मानवी जन्माचे धर्म – डॉ.भरत बलवल्ली, स्वामी दर्शनाअंती डॉ.बलवल्लींचे भावोद्गार

आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य महान

स्वामी भक्तीच माझ्या मानवी जन्माचे धर्म – डॉ.भरत बलवल्ली, स्वामी दर्शनाअंती डॉ.बलवल्लींचे भावोद्गार

HTML img Tag Simply Easy Learning    

आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य महान

HTML img Tag Simply Easy Learning    

स्वामी दर्शनाअंती डॉ.बलवल्लींचे भावोद्गार

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२३/१२/२३) – आपणास देवाने जे दिले आहे त्यात समाधान मानणे यातच जीवनाची धन्यता आहे. त्याकरिता भाविकांनी स्वामीभक्तीत गुंतून स्वामींचे नामस्मरण, मनन, चिंतन करीत राहणे यातच जीवनाचे सौख्य सामावले आहे. स्वामी भक्तीने जीवनाचा अर्थ समजून जीवन सोपे होते. ही प्रचिती मला आली आहे, म्हणून स्वामीभक्ती हीच माझ्या मानवी जीवनाचे धर्म असल्याचे
मनोगत विश्वविख्यात शास्त्रीय गायक व अध्यात्मिक गुरु डॉ.भरत बलवल्ली यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी डॉ.बलवल्ली यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या प्रसंगी बोलताना डॉ.बलवल्ली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना डॉ.बलवल्ली यांनी
आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे कार्य खुप महान असल्याचे मनोगतही डॉ.बलवल्ली यांनी व्यक्त केले.
यावेळी मंदिर समितीचे श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, सचिन हन्नूरे, भिमा मिनगले, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – डॉ.भरत बलवल्ली यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे, व्यंकटेश पुजारी दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button