
*”रक्तदान ही काळाची गरज ” प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार*
हालचिंचोळी(ता.अकलकोट)
श्री मलकारसिद्ध हायस्कूल हालचिंचोळी प्रशालेत स्वर्गीय भुताळी बिरप्पा सुरवसे यांच्या 21 व्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार म्हणाले की, रक्ताची निर्मिती कोणत्याही कारखान्यात होत नाही त्याला शरीरातील नैसर्गिक घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे रक्तदानाचे महत्व युवकामध्ये रुजविण्यासाठी रक्तदान शिबिरात महत्त्व पटवून देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
मलकारसिध्द प्रशाला ही अनेक उपक्रमातून समाज प्रबोधन आणि शैक्षणिक उपक्रम राबवून प्रबोधन करीत असल्याने संस्था व कर्मचारी यांचे कौतुक केले पाहिजे.
या प्रसंगी श्री शावरसिद्ध हायस्कूल आचेगावचे निवृत्त मुख्याध्यापक सिद्धाराम काळे व शिवशरण म्हेत्री यांनी आपल्या मनोगतातून
दानाचे विविध प्रकार सांगितले. या उद्घाटन प्रसंगी माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे , डॉ. लिंगराज बोकडे, संस्थेचे संस्थापक म्हाळप्पा सुरवसे, संजय बनसोडे, सोपान लवटे, उत्तम साबळे ,मुख्याध्यापक व्यंकटेश बोकडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
