गावगाथा

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने भक्तांना सोयीसुविधा उपलब्द करून देण्यासाठी प्राधान्यक्रम दिले असून,आजवर हाती घेतलेले उपक्रम हे अव्वल ठरले आहें ; ख्यातनाम शिल्पकार भगवानराव रामपूरे

अन्नछत्र मंडळात लवकरच नवीन महाप्रसाद गृह उभारणार आहे.याकरिता स्वामींच्या नवीन पुजेची मूर्ती शिल्पकार भगवानराव रामपूरे साकारणार

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने भक्तांना सोयीसुविधा उपलब्द करून देण्यासाठी प्राधान्यक्रम दिले असून,आजवर हाती घेतलेले उपक्रम हे अव्वल ठरले आहें ; ख्यातनाम शिल्पकार भगवानराव रामपूरे

HTML img Tag Simply Easy Learning    

अन्नछत्र मंडळात लवकरच नवीन महाप्रसाद गृह उभारणार आहे.याकरिता स्वामींच्या नवीन पुजेची मूर्ती शिल्पकार भगवानराव रामपूरे साकारणार

HTML img Tag Simply Easy Learning    

🔶अक्कलकोट : (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३६ वर्षाच्या कालखंडात संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली तर प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली स्वामी भक्तांना सोयीसुविधा उपलब्द करून देण्यासाठी प्राधान्यक्रम दिले असून,आजवर हाती घेतलेले उपक्रम हे अव्वल ठरले आहेंतच, आता न्यासाच्या परिसरात लवकरच नवीन महाप्रसाद गृह उभारणार आहे.याकरिता स्वामींच्या नवीन पुजेची मूर्ती बनविण्याच्या कामाकरिता ख्यातनाम शिल्पकार भगवानराव रामपूरे सोलापूर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या कामासाठी अनामत रक्कमेचा धनादेश श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून रविवारी देण्यात आले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

महाप्रसादालयात झालेल्या छोटे खानी कार्यक्रमात सदरचा धनादेश प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते ख्यातनाम शिल्पकार भगवानराव रामपूरे सोलापूर यांना देण्यात आला. याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, भाऊ कापसे, न्यासाचे लेखापरीक्षक ओमकारेश्वर उटगे, कायदे विषयक सल्लागार अँड.संतोष खोबरे, सदस्य अरविंद शिंदे, पुरोहित अप्पू पुजारी, दत्ता माने, सर्फराज शेख, निखील पाटील, गोटू माने यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. 

HTML img Tag Simply Easy Learning    

*⭕चौकट :
*व्हियेतनाम मारबलची मूर्ती साकारणार :
स्वामींच्या नवीन पुजेची मूर्ती ख्यातनाम शिल्पकार भगवानराव रामपूरे सोलापूर यांच्या कडून ६ फुट उंची ची असणार आहे. सदरची मूर्ती व्हियेतनाम मारबल मधून साकारणार आहेत. न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी जी पेंटिंग केलेली आहे. तिच मूर्ती बनविण्यात येणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

*⭕चौकट :
*अन्नछत्र मंडळ व माझा संबंध गेल्या १५ वर्षापासून :
संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली तर प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले स्वामी कार्य उल्लेखनीय आहे. भक्त सेवेला प्राधान्य देणारे अन्नछत्र मंडळ व माझा संबंध गेल्या १५ वर्षापासूनचा आहे. श्रीक्षेत्र अक्कलकोट मध्ये कामाची सुरुवात अन्नछत्र मंडळातून झाली आहे. स्वामी भक्तांना भेट देण्यासाठी श्रींची मूर्ती बनविण्याची ऑर्डर  संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी यापूर्वीच दिलेली होती. ६ फुटाची मूर्ती पहिल्यांदाच साकारत आहे. सदरची श्रींची मूर्ती ही येत्या दत्त जयंती सन २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे धाडस करतोय. ते स्वामी करून घेतील.
                                                               
     -भगवानराव रामपूरे                                             ख्यातनाम शिल्पकार, सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button