अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांचा उज्जेन महाकालचे महापौर भाजपा मुकेशजी टटवाल यांनी स्वागत करून सत्कार
सत्कार सन्मान

*अक्कलकोट:- प्रतिनिधी*
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांचा उज्जेन महाकालचे महापौर भाजपा मुकेशजी टटवाल यांनी स्वागत करून सत्कार केले.*

टीम अमोलराजे मित्र परिवार उज्जेन महाकाल येथे देवदर्शनासाठी गेले असता, उज्जेन (महाकाल) नगरीच्या वतीने अमोलराजे भोसले व त्यांच्या मित्रपरिवाराचे स्वागत केले. या प्रसंगी श्री कैलाश प्रजापतजी MIC सदस्य एवं पार्षद वार्ड ४६ श्री पवन गेहलोत जी बीजेपी नेता ३५, ३७ ग्रुप संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड पुणे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अमित व अभिषेक राठोड हे उपस्थित होते.

याप्रसंगी महापौर मुकेशजी टटवाल यांनी मध्यप्रदेशात श्री स्वामी समर्थांचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य ही मध्य प्रदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोहचेले आहे. असे यावेळी म्हणाले. याप्रसंगी अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी महापौर मुकेशजी टटवाल व त्यांच्या टीमला श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात येण्याचे निमंत्रण दिले. व टटवाल व त्यांच्या टीमला श्रींची प्रतिमा व प्रसाद देण्यात आला.

यावेळी संदीप फुगे, मनोज निकम, किरण पाटील, सिद्धेश्वर मोरे, योगेश कटारे, पिंटू दोडमनी, शितल जाधव, महेश मुळे, ऋषिकेश लोणारी, श्रीकांत झिपरे, संजय गोंडाळ, अंकुश चौगुले, अतिश पवार, बाळासाहेब पोळ, प्रवीण घाडगे, समर्थ घाडगे, यांच्यासह टीम अमोलराजे मित्रपरिवार उपस्थित होता.
