अन्नछत्र मंडळात सोमवारी लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ;दरम्यान गेल्या १५ दिवसाच्या गर्दीच्या काळात केलेल्या नियोजनाबाबत प्रशासनाकडून प्रशंसा तर भक्तातून स्वागत व समाधान व्यक्त
परिसरातील स्वच्छता यासह पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी, गर्दीतील नम्रपणा या एकूणच सर्व नियोजन बाबत अन्नछत्र मंडळाच्या कार्याने भारावलो आहोत. - अमरसिंह घोरपडे, स्वामी भक्त कोल्हापूर
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/01/IMG-20240101-WA0072-780x470.jpg)
अन्नछत्र मंडळात सोमवारी लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ;दरम्यान गेल्या १५ दिवसाच्या गर्दीच्या काळात केलेल्या नियोजनाबाबत प्रशासनाकडून प्रशंसा तर भक्तातून स्वागत व समाधान व्यक्त
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली न्यासाच्या परिसरात नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्यातील विविध भजनी मंडळाकडून आपली सेवा रुजू केले. सोमवारी लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले. दरम्यान न्यासाकडून गेल्या १५ दिवसाच्या गर्दीच्या काळात केलेल्या नियोजनाबाबत प्रशासनाकडून प्रशंसा तर भक्तातून स्वागत व समाधान व्यक्त होत आहे. दुपारी व रात्रो उशिरापर्यंत भक्तांच्या सेवेर्थ महाप्रसादाबरोबरच निवास, पार्किंग, महाप्रसाद रांग, वयोवृद्ध माता-भगिनी, हिरकणी कक्ष अशा विविध व्यवस्थेबाबत दिलेले प्राधान्य क्रम, परिसरातील स्वच्छता यासह पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी, गर्दीतील नम्रपणा या एकूणच सर्व नियोजन बाबत अन्नछत्र मंडळा हे अव्वल ठरले आहे.*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
गतवर्षातील नाताळ सुट्टी व मार्गशीर्ष महिना, नववर्षारंभ यामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गर्दीत वाढ झाली होती. गेल्या १५ दिवसात सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक समर्थ नगरीत दाखल झाले होते. गत सुट्टीत झालेल्या गर्दीने वाहतुकीची कोंडी, निवासासाठी प्रतीक्षा व नाहक त्रास, अरुंद रस्ते व अस्वच्छता यामुळे भाविकांना अनेक अडचणीच्या सामोरे जावे लागले होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
नव्या वर्षात पहाटे तर दर्शनाची रांग राजे फत्तेसिंह चौक पार झाली होती. दिवाळी सुट्टीच्या वेळी भाविकांना दर्शनासाठी आठ ते दहा तास लागत होते. हि पार्श्वभूमी पाहता आगामी सुट्यांच्या दिवशी वटवृक्ष देवस्थान, मुरलीधर मंदिर, समाधी मठ (चोळप्पा मठ), गुरु मंदिर (बाळप्पा मठ), राजेराय मठ, शिवपुरी, नवसाचा मारुती मंदिर, एकमुखी दत्त मंदिर व अन्नछत्र मंडळ व परिसरातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर येथे दर्शनासाठी व महाप्रसादाकरिता या नव्या वर्षात गर्दी झालेली होती.
सलग सुट्यांमुळे पोलिस प्रशासनाने शहरातील वाहनांची कोंडी टाळावी म्हणून कमलाराजे चौक, कारंजा चौक, मैंदर्गी रोड या ठिकाणी बॅरिकेडिंग लावण्यात आले होते. वाहनांना मंदिर परिसरात सोडले नाही. समाधी मठाजवळ दाटीवाटीने भक्तांना मंदिरापर्यंत पोहोचावे लागते, याबाबत प्रशासनाने सुटसुटीतपणा आणण्याकामी विशेष योजना आखणे गरजेचे आहे.
*⭕चौकट :*
*अन्नछत्र मंडळाच्या कार्याने भारावलो :*
श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने आम्हा भक्तांकरिता अशा प्रचंड गर्दीमध्ये केलेली व्यवस्था, राज्यात अन्य धार्मिक क्षेत्रात पाहायला मिळालेली नांही. भक्ताच्या सेवेला प्राधान्य देत त्यांनी केलेल्या व्यवस्थेमुळे रात्रो उशिरापर्यंत लाखो स्वामी भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळाला आहे. महाप्रसादाबरोबरच निवास, पार्किंग, महाप्रसाद रांग, वयोवृद्ध माता-भगिनी, हिरकणी कक्ष अशा विविध व्यवस्थेबाबत दिलेले प्राधान्य क्रम, परिसरातील स्वच्छता यासह पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी, गर्दीतील नम्रपणा या एकूणच सर्व नियोजन बाबत अन्नछत्र मंडळाच्या कार्याने भारावलो आहोत.
– अमरसिंह घोरपडे, स्वामी भक्त कोल्हापूर