गावगाथा

सोलापुरात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कार्यालय सुरू ; लिंगायत समाजाच्या नेत्यांनी दिली भेट

लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारच्या वतीने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ची स्थापना करण्यात आली आहे

सोलापुरात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कार्यालय सुरू ; लिंगायत समाजाच्या नेत्यांनी दिली भेट

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर : लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारच्या वतीने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ची स्थापना करण्यात आली त्या अंतर्गत सोलापुरात या महामंडळाचे कार्यालय सुरू झाले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

मंगळवारी लिंगायत समाजातील नेत्यांनी या कार्यालयाला भेट देऊन महात्मा बसवेश्वर ब्लड बँक व राष्ट्रीय लिंगायत महामंचच्या वतीने लिंगायत धर्म रक्षक विजयकुमार हत्तुरे यांनी जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा भेट दिली. यावेळी महामंडळाचे अकाउंटंट सौ रजनी लगशेट्टी, लिंगायत समाजाचे नेते सकलेश बाभूळगावकर,नामदेव फुलारी,सचिन शिवशक्ती, नागेश पडणुरे,सचिन तूगावे,सुरज दरेकर आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी विजयकुमार हत्तुरे यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून सुरू केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. सध्या या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असून ते तात्काळ भरली जावी अशी मागणी करत समाज बांधवांनी 36 जिल्ह्यांमध्ये कार्यालयात जाऊन महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा भेट द्यावी असे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button