गावगाथा

मुरुम बीटस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेस मोठा प्रतिसाद

येथील बीटस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जीवराज पडवळ यांच्या हस्ते करताना विजयकुमार कोळी, विजयकुमार देशमाने, रमेश सावंत, बालाजी भोसले, कमलाकर मोटे व खेळांडू

मुरुम बीटस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेस मोठा प्रतिसाद

मुरूम, ता. उमरगा, ता. २ (प्रतिनिधी) : धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांच्या संकल्पनेतून शालेय क्रिडा स्पर्धा दि. २ ते ४ जानेवारी दरम्यान होत आहेत. मुरूम बीटस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी जीवराज पडवळ यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २) रोजी करण्यात आले. यावेळी केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार कोळी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने, बेळंब केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश सावंत, केसरजवळगा केंद्रप्रमुख बालाजी भोसले, उच्च प्राथमिक शाळेचे (कंटेकुर) मुख्याध्यापक कमलाकर मोटे, आनंदनगरचे मुख्याध्यापक नागनाथ जट्टे, क्रिडा शिक्षक प्रविण नलवाड, संतोष कडगंचे, आबाराव कांबळे, विलास कंटेकूरे, काशिनाथ भालके , तानाजी बिराजदार, रुपचंद ख्याडे, शिवाजी कवाळे, गोविंद जाधव, गोविंद कुंभार, विठ्ठल कुलकर्णी, संतोष बोडरे, हरीभाऊ राठोड, राजू पवार, सुरेखा खंडागळे, कलशेट्टी, रेणूका कुलकर्णी, काशिबाई राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बीटमधील विविध शाळेतील खेळाडूंसह मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, सहशिक्षक सहभागी झाले होते. तीन दिवशीय बीटस्तरीय स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व वैयक्तिक मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील बीटस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जीवराज पडवळ यांच्या हस्ते करताना विजयकुमार कोळी, विजयकुमार देशमाने, रमेश सावंत, बालाजी भोसले, कमलाकर मोटे व खेळांडू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button