मातोश्री निलव्वाबाई खेडगी प्रशालेमध्ये गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा
कार्यक्रमास प्रमुख अतिथी तथा परिक्षक म्हणून गणित प्रा. सिध्दाराम हालतोट,प्रा. दिपा वलेकर उपस्थित होते.

अक्कलकोट, दि. २- येथील मातोश्री निलव्वाबाई खेडगी प्रशालेमध्ये गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालिका पवित्रा खेडगी हे होत्या.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी तथा परिक्षक म्हणून गणित प्रा. सिध्दाराम हालतोट,प्रा. दिपा वलेकर उपस्थित होते.

२२ डिसेंबर रोजी भारतात दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिन निमित्त हा दिवस साजरा केला जातो. गणिताच्या विविध क्षेत्रांमध्ये आणि शाखांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे ते जगप्रसिद्ध गणितज्ञ होते. रामानुजन हे प्रचंड बुद्धिमान होते. त्यांनी गणिताला केवळ वेगळी ओळखच दिली नाही तर अनेक प्रमेये आणि सूत्रे दिली. जी आजही अतिशय उपयुक्त मानली जातात. गणिताच्या क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानाची दखल घेऊन त्यांचा जन्मदिवस ‘गणित दिवस’ किंवा ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून साजरा केला जातो, असे अध्यक्ष समारोपातून संचालिका पवित्रा खेडगी यांनी भाषणात व्यक्त केले.

अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात रुबिक क्यूब, सुडोकू हे गणितीय खेळ घेण्यात आले. शंभर हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन प्रोजेक्ट सादर केले होते. संचालिका खेडगी यांनी प्रोजेक्ट ची पाहणी करून विद्यार्थ्यांची कौतुक केले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक जयदीप साखरे यांनीही गणिताचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री राठी यांनी केले तर आभार श्रुती भरमशेट्टी यांनी मानले. या कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक व शिक्षिका वर्ग उपस्थित होते.
