म्हेत्रे साहेब लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार – “त्यांचा निर्णय योग्य, आम्ही त्यांच्या सोबत आहोत” – स्वामी चौगुले

HTML img Tag
अक्कलकोट — : अक्कलकोट तालुक्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, ज्येष्ठ नेते म्हेत्रे साहेब लवकरच शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. या संभाव्य निर्णयाचे स्वागत करत स्वामी चौगुले यांनी म्हटले की, “म्हेत्रे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य असून आम्ही त्यांच्या सोबत आहोत.”
म्हेत्रे साहेब हे गेली अनेक वर्षे जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे एक प्रामाणिक व सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाची शक्यता व्यक्त होताच त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
स्वामी चौगुले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाभिमुख राजकारण उभे राहत आहे. अशा वेळी म्हेत्रे साहेबांचा शिंदे गटात जाण्याचा विचार हा योग्यच आहे. आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत.”
Back to top button
×
No WhatsApp Number Found!