गावगाथा

आपले सरकार पोर्टल वर ‘कोळी’ पर्याय उपलब्ध करून आदिवासी कोळी जमातील न्याय देणार – महामहिम राज्यपाल श्री. रमेश बैस ह्यांचे आश्वासन…

आदिवासी कोळी जमातीचे अभ्यासक डॉ. शरण खानापुरे सर व आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटनेचे शिष्टमंडळ हयांची महामहिम राज्यपाल रमेशजी बैस यांच्यासोबत आदिवासी कोळी जमातीच्या विविध प्रश्नावर बैठक पार पडली.

आपले सरकार पोर्टल वर ‘कोळी’ पर्याय उपलब्ध करून आदिवासी कोळी जमातील न्याय देणार – महामहिम राज्यपाल श्री. रमेश बैस ह्यांचे आश्वासन…
आदिवासी कोळी जमातीचे अभ्यासक डॉ. शरण खानापुरे सर व आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटनेचे शिष्टमंडळ हयांची महामहिम राज्यपाल रमेशजी बैस यांच्यासोबत आदिवासी कोळी जमातीच्या विविध प्रश्नावर बैठक पार पडली.

HTML img Tag Simply Easy Learning    


*अक्कलकोट:-* यावेळी ‘कोळी’ ही एक आदिम जमात असल्यामुळे सन १९७६ मध्ये केद्र शासनाने “कोळी” जमातीला अनुसूचित जमातीच्या यादी मध्ये अनुक्रमांक 28 वर समाविष्ट केले आहे. परंतु 1976 ची यादी आपले सरकार पोर्टल व etribe validity पोर्टल वर चुकीची यादी असल्यामुळे आदिवासी पडताळणी समिती व प्रांत अधिकारी जमातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र वितरीत करत नाहीत त्यामुळे अधिवासी कोळी जमात १९७६ पासून सविधानिक अधिकारापासून म्हणजे जवळपास 48 वर्ष वंचित आहेत. केंद्रशासन मध्ये अनुक्रमांक 28 वर ‘कोळी’ असुनसुद्धा राज्यतील यादी मध्ये चुकीची दाखवण्यात आली आहे . सदर बाब ही अत्यंत गंभीर असून यामुळे मा. राष्ट्रपती व संसदचा अवमान होत आहे.त्यामुळे राजद्रोह सारखे गंभीर गुन्हे पात्र ठरतात. सदर बाब हि गंभीर स्वरूपाचे असून, महामहीम राज्यपाल यांनी तात्काळ दखल घेऊन आपले सरकार पोर्टल व etribe validity 1976 च्या केंद्रशासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादि प्रमाणे सुधारणा करन अनुक्रमाक् 28 वर ‘कोळी’ जमातीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा.
तसेच या पूर्वी पोर्टलपरीलवर अनुक्रमांक २८ वर ‘कोळी’ पर्याय नसल्या मुळे अनेक अर्जदारांचे अनुसूचित जमातीचे दाखले प्रांताने नाकाराले व पडताळणी समितीने अवैध केले, त्यामुळे अनेक कर्मचारी अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले. अशी सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्या मूळपदावर सन्मानाने वर्ग करण्यात यावे अशी मागणी प्रा. डॉ. खानापुरे यांनी केली .
या वेळी महामहीम राज्यपाल साहेबनी सर्व कायदेशीर पुराव्य्याचे अवलोकन केले व सर्व समजून घेतले . यावेळी त्यांनी कायदेशीर बाबी पडताळून लवकर पोर्टलवर
बदल करून आदिवासी कोळी जमातीला दाखले व वैधता प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिष्टमंडळाने लवकरात लवकार कारवाई झाली पाहिजे अन्यथा राज्यतील ६० लक्ष अधिवाशी कोळी बांधव संपूर्ण राज्यामध्ये सनदशीर मार्गाने जो पर्यंत पोर्टल मध्ये मूळ यादी समावेश करत नाही तोपर्यंत आदोलन करतील असे सागण्यात आले .
सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या कडून विशेष मिटींग आयोजित केली होती.यावेळी आधिवासी कोळी जमाती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ . आर जी खानापुरे ,दीपक शिरसाट ,प्रा. नरेंद्र बोरसे ,पांडुरंग धोंडगे ,दत्तात्रय सुरवसे ,जितेंद्र भाले,शैलेश साळुंखे ,अशोक अधटराव ,विलास अंभोरे ,अक्षय बेद्रे,शिवानंद जमादार ,रविकांत शिरसीकर,विश्राम चुनेकर,प्रदीप पाटील हे उपस्थित होते .

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button