श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी दररोज अलोट गर्दी होत आहे सुरक्षेसाठी बॉम्ब शोधक व नाशक, श्वान या पथकांचे न्यासाच्या परिसरात प्रात्येक्षिक संपन्न
पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रीतमकुमार यावलकर, अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावर यांच्या सुचनेनुसार उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी दररोज अलोट गर्दी होत आहे सुरक्षेसाठी बॉम्ब शोधक व नाशक, श्वान या पथकांचे न्यासाच्या परिसरात प्रात्येक्षिक संपन्न


*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वंस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी न्यास हे अग्रगण्य असून, सुरक्षेच्या दृष्टीने देखील न्यास हे दक्ष आहे. महाप्रसादासाठी दररोज अलोट गर्दी होत आहे, या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रीतमकुमार यावलकर, अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावर यांच्या सुचनेनुसार उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यासह बॉम्ब शोधक व नाशक, श्वान या पथकांचे न्यासाच्या परिसरात प्रात्येक्षिक संपन्न झाले.


गुरुवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान न्यासाच्या परिसरात एक बेवारस बॅग सापडल्याने सर्वांनीच आपले श्वास रोखून धरले होते. न्यासाकडून पोलीस ठाण्याला संपर्क साधून संपूर्ण माहिती देण्यात आली. याबाबत पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सदर घटनेबाबत अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावर यांना त्वरित माहिती दिली असता तातडीने सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक, श्वान या पथकांशी संपर्क करण्यात आला. काही क्षणांतच बॉम्बशोधक आणि नाशक पथकाची गाडीही अन्नछत्र मंडळात येऊन धडकली. याप्रसंगी अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावर व उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांचे पथक देखील उपस्थित होते.

सदरचे पथक घटनास्थळी पोहोचताच तातडीने बॉम्ब शोधक व नाशक, श्वान या पथकांचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार व श्वान हस्तक पो.हे.कॉं. रियाज मुजावर यांच्या पथकाने सदर बेवारस बॅग तपासणी केली असता त्या बॅगेत वयोवृद्ध इसमाचे साहित्य मिळवून आले. दरम्यान सदरची घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने घटना स्थळी एकच गर्दी झालेली होती. मात्र उपस्थित अधिकाऱ्यांनी सदरची घटना ही प्रात्येक्षिक असल्याचे सांगताच उपस्थितांनी सुस्कारा सोडले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे व सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, धानप्पा उमदी, बाळासाहेब घाडगे, कल्याण देशमुख, शावरप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुर, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, श्रीमती चव्हाण, सतीश आवळे, धनराज शिंदे, गजानन शिंदे,अंगत गिते, चिदानंद उपाध्याय, केदारनाथ सुतार, चंद्रकांत बेळ्ळे, रियाज शेख, गोपाळराव शिंदे आणि सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
*⭕चौकट :*
संशयित वस्तू सापडली की पोलिसांचे श्वानपथक या वस्तूची तपासणी करते आणि क्षणार्धात सर्वांचा जीव भांड्यात पडतो. पण अनेकांचे जीव वाचवणाऱ्या या श्वानपथकाचे कार्य कौतुकास्पद आहे. पोलिसांच्या फौजफाट्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आपत्कालीन परिस्थितीत भक्कम आधार असलेला विभाग म्हणजे बॉम्बशोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) त्यातही बॉम्ब केवळ हुंगून शोधणारे श्वान म्हणजेच कोको डॉग पोलिसांचे हुकुमी एक्का.