श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य : संग्राम अतितकर
अक्कलकोटचे सुपुत्र प्रसिध्द क्रिकेट पटू सत्यजित दत्तात्रय जाधव हे उपस्थित होते.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य : संग्राम अतितकर

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असल्याचे मनोगत महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष संग्राम अतितकर यांनी व्यक्त केले.*

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे व्यवस्थापक मंदार देडगे, खेळाडू विशंत मोरे, हितेश वाळूंज यांचा देखील सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला. त्यांच्या समवेत श्रीक्षेत्र अक्कलकोटचे सुपुत्र प्रसिध्द क्रिकेट पटू सत्यजित दत्तात्रय जाधव हे उपस्थित होते.

यावेळी पिंटू दोडमनी, शिवराज स्वामी, मैनुद्दीन कोरबू, सरफराज शेख, अतिश पवार व न्यासाचे शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, धानप्पा उमदी, बाळासाहेब घाडगे, कल्याण देशमुख, शावरप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुर, गोविंद शिंदे, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
