आळगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांचे वनभोजन उत्साहाने संपन्न
वनभोजन कार्यक्रम

आळगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांचे वनभोजन उत्साहाने संपन्न



आळगे — भविष्यवेधी शिक्षण पद्धतीला अनुसरून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गड्डेप्पा कोरे सावकार, दयानंद कोरे सावकार त्यांचे पिताश्री शिवयोगी कोरे सावकार यांच्या मळ्यात आनंददायी शिक्षण पद्धतीतील वनभोजन हा उपक्रम त्यांच्या मळ्यात घेण्यात आले यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शरणु माळगे सावकार, गुरु माळगे सावकार, चिकीरेप्पा माळगे, धरेप्पा पतरके, महांतेश माळगे, नागप्पा कोरे सावकार, सुधाकर माळगे, आमोगी पुजार गावचे उपसरपंच रियाज मुल्ला शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व्हनप्पा कोळी ,गावचे मान्यवर उपस्थित होते.

मळ्यात अतिशय सुंदर अशा पद्धतीने टेन्ट मारले होते. अतिशय स्वादिष्ट असा भोजनाचा आस्वाद घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी श्री मुख्याध्यापक शेख सर, मेळकुदे सर, पटेद मॅडम गिरीश कोरे सर, बिराजदार सर, हणम शेट्टी सर, नी ल कोळी सर, पुजारी सर, एस एस कोळी सर, कुमठे मॅडम, अनिल टाकळे या सर्व मान्यवरांचा शाल फेटा बांधून कोरे परिवाराकडून सत्कार करण्यात आले. आयुष्यातील अविस्मरणीय वनभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
