गावगाथा

सोलापुरात महायुतीची वज्रमूठ !

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील महायुतीच्या नेत्यांची महायुतीचा समन्वयक या नात्याने हॉटेल साईप्रसाद या ठिकाणी पहिली बैठक घेतली.

सोलापुरात महायुतीची वज्रमूठ !

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील महायुतीच्या नेत्यांची महायुतीचा समन्वयक या नात्याने हॉटेल साईप्रसाद या ठिकाणी पहिली बैठक घेतली.

या बैठकीत येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने येत्या १४ जानेवारीला दुपारी ३ वाजता सोलापूरात जामगुंडी मंगल कार्यालय या ठिकाणी महायुतीचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपण सर्वांनी एकसंघाने मिळून काम करु व विरोधकांना आपली ताकद या माध्यमातून दाखवून देऊ असे मत या बैठकीत व्यक्त केले.

या बैठकीस खासदार मा. डॉ जयसिध्देश्वर महास्वामी, आमदार श्री. यशवंत माने, भाजप शहराध्यक्ष श्री. नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पवार, कार्याध्यक्ष श्री. जुबेर बागवान, भाजपचे प्रदेश कार्यकारीणीचे श्री. शहाजी पवार, शिवसेनेचे श्री. महेश साठे, श्री. कल्याणराव काळे, श्री. धैर्यशील मोहीते -पाटील, श्री. विक्रम देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. मनिष काळजे, श्री. दिलीप कोल्हे, माजी गटनेत श्री. किसन जाधव, श्री. मनोज शेजवाळ, श्री. राजेंद्र हजारे, श्री. जमिर शेख, श्री. अजित कुलकर्णी, श्री. महेश निकंबे, आनंद मुस्तारे, प्रमोद भोसले, वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, RPI गटाचे सुशिल सरवदे, अतुल नागटिळक, शिवम सोनकांबळे, रुषी घोलप,
यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची शिवसेना शिवसेना, रयत क्रांती सदाभाऊ खोत गट, RPI आठवले गट, प्रहार, शिवसंग्राम या सर्वच प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button