गळोरगी येथे श्री रेवणसिध्देश्वर यात्रा महोत्सव ११ ते १६ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन
ग्रामदैवत श्री रेवणसिध्देश्वर महाराज व मानाच्या नंदीध्वजास समस्त ग्रामस्थांच्या वतीने तैलाभिषेक होईल.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/01/IMG-20240110-WA0057-506x470.jpg)
गळोरगी येथे श्री रेवणसिध्देश्वर यात्रा महोत्सव ११ ते १६ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
ता. अक्कलकोट जि सोलापुर मौजे गळोरगी येथे ता. ११ जानेवारी २०२४ ते १६ जानेवारी २०२४ पर्यंत दरवर्षी प्रमाणे यंदाही जगदगुरु श्री रेवणसिध्देश्वर यात्रा महोत्सव संपन्न होत आहे.मकरसंक्रात निमित्त श्री रेवणसिध्देश्वर पंचकमिटी गळोरगी यांच्या वतीने यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.ता. ११ जानेवारी ते १६ जानेवारी पर्यंत दररोज रात्री ९ ते ११ पर्यंत वे. मल्लय्या स्वामी यांचा पटाक्षी कार्यक्रमााचे आयोजन करण्यात आले आहे.ता. १४ जानेवारी भोगी दिवशी सकाळी ग्रामदैवत श्री रेवणसिध्देश्वर महाराज व मानाच्या नंदीध्वजास समस्त ग्रामस्थांच्या वतीने तैलाभिषेक होईल.ता. १५ जानेवारी रोजी सकाळ पासुन ग्रामदैवतास गावकरी यांच्या वतीने नैवेद्य दाखविला जाईल.दुपारी २ वाजल्या पासुन ग्रामदैवत जगदगुरु श्री रेवणसिध्देश्वर महाराज आणि श्री बिरलिंगेश्वर महाराज पालखी व नंदीध्वज सवाद्य मिरवणुक ढोल ताशांच्या गजरात सर्वांच्या उपस्थितित निघेल.नंतर दोन्ही पालख्या देवभेटी साठी मिरजगी येथे जातील.देवभेटी नंतर रात्री पालख्यांचे शोभेचे दारुकाम व आतीशबाजी करुन स्वागत करण्यात येईल.१६ जानेवारी सकाळी ७ वाजता मंदीरात वे.मल्लय्या स्वामी कोन्हाळी यांच्यावतीने १००८ फुट लांबीचा शस्त्र ग्रामदैवत श्री रेवणसिध्देश्वर महाराज यांना अर्पण करण्यात येईल.दिवसभर तनक विधाश्री (मुसुबीनाळ) आणि मत्कुमसाब मकानदार (सुत्राळ) यांचा भक्तीगीते व गायनांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचकमिटीच्यावतीने सर्व भक्तांसाठी यात्रेदिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .सायंकाळी ५ वाजता खास कुस्ती शौकींनासाठी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.ता. १६ व १७ जानेवारी रोजी रात्रौ १० वाजता श्री साईबाबा नाट्यसंघ निर्णाववाडी ता. चिडगुंप यांच्या वतीने अण्णा तंगी हे सुंदर कन्नड नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही जगदगुरु श्री रेवणसिध्देश्वर युवामंच व गळोरगी ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अक्कलकोट व पंचक्रोशीतील नागरीकांनी उपस्थित राहुन यात्रेची शोभा वाढवावी असे आव्हान पंचकमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)