सोलापूरकरांची प्रभू श्रीरामचंद्रासाठी हातमागावर विणनारी वस्त्र सेवा…!
०५ जानेवारीपासून श्री पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात सुरू आहे. हा कार्यक्रम १४ जानेवारी पर्यंत चालणार आहे.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/01/FB_IMG_1704889830090-780x470.jpg)
सोलापूरकरांची प्रभू श्रीरामचंद्रासाठी
हातमागावर विणनारी वस्त्र सेवा…!
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
सोलापूर — ५०० वर्षापेक्षा अधिक धार्मिक संघर्षानंतर प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न २२ जानेवारी रोजी प्रत्यक्ष साकारत आहे. हिंदुसाठी २०२४ दिनदर्शिकेची पहिली दिवाळी साजरी होतेय. याच भक्तीमय वातावरणात भारत देशाचं मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहरात हजारो श्रीराम भक्त हातमागावर वस्त्र विणून हे “देव वस्त्र” प्रभू श्रीराम चरणी अर्पण करणार आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
धागे विणू या प्रभू श्रीरामचंद्रासाठी या घोषवाक्याने सुरू असलेल्या या अनोख्या धार्मिक संकल्पना कार्यक्रमात आज रोजी मला सहभाग होऊन सेवा करण्याचं भाग्य मिळालं.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
हा अनोखा धार्मिक कार्यक्रम श्री विवेकानंद केंद्र कन्याकुमारी सोलापूर विभाग व श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम् यांच्या संयुक्त विद्यमाने ०५ जानेवारीपासून श्री पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात सुरू आहे. हा कार्यक्रम १४ जानेवारी पर्यंत चालणार आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
हातमाग वर विणलेल्या वस्त्रामुळे आपल्या घरी राहूनही प्रभू श्रीराम यांच्या चरणी आपले हात स्पर्श होतील. असा भक्तीमय कार्यक्रमात श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकांचे मनस्वी आभार.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
हा भक्तीमय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यानारायण गुर्रम, यादगिरी बोम्मा, पेंटाप्पा गड्डम, दीपक पाटील, अंबादास नक्का आदींसह केंद्राचे व देवस्थानचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेतायत.