राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी जीवन जगत असताना सामाजिक कार्यासोबतच आपला सर्वांगीण विकास कसा करावा.महात्मा गांधीजी यांच्या संकल्पनेतून युवा पिढी निर्माण व्हावे —चेअरमन बसलिंगप्पा खेडगी
या शिबिरातील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला स्वयंसेवक हणमंत मोरे ( बी. ए. भाग दोन) यानी आपल्या मनोगतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हुबेहूब आवाजातून विचार व्यक्त करुन उपस्थितांचे मने जिंकून घेतले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी जीवन जगत असताना सामाजिक कार्यासोबतच आपला सर्वांगीण विकास कसा करावा.महात्मा गांधीजी यांच्या संकल्पनेतून युवा पिढी निर्माण व्हावे —चेअरमन बसलिंगप्पा खेडगी

अक्कलकोट, दि. १०- राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी जीवन जगत असताना सामाजिक कार्यासोबतच आपला सर्वांगीण विकास कसा करावा. महात्मा गांधीजी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण समाजाचा उद्धार व्हावा, मग राष्ट्राचा उद्धार होईल, अशा पद्धतीचे अंतरंग बाळगणारी युवा पिढी निर्माण होण्याचे आवाहन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी केले.

चपळगांव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व सी. बी. खेडगी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवशीय ‘युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास’ या ब्रीदवाक्य असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता समारंभात चेअरमन खेडगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर सरपंच वर्षा भंडारकवठे, समाजसेवक सिध्दाराम भंडारकवठे, ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे, प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट, उपप्राचार्य बसवराज चडचण, प्रभारी पर्यवेक्षक संजय कलशेट्टी, ग्रामविकास अधिकारी सोमलिंग कणगी,महादेव वाले,
कार्यक्रमाधिकारी डॉ. गुरुसिध्दय्या स्वामी, प्रा. सिध्दाराम पाटील, प्रा. प्रकाश सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात स्वच्छता अभियान, नाली स्वच्छता, गटार-रस्ते स्वच्छता, शोष खड्डे तयार करणे, स्मशानभूमीची साफसफाई व सपाटीकरण करण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्त भारत जनजागृती, मंदिर परिसरातील स्वच्छता, ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाबाबत जनजागृती, घरोघरी जनजागृती, जनावरांचा मोफत तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप, शालेय क्रीडांगण स्वच्छता, आपले आरोग्य आपले सर्वस्व जनजागृती, आई बाबांच्या पादपूजा, बसव वचन असे विशेष कार्यक्रम पार पडले.

माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. भिमाशंकर बिराजदार यांचे व्याख्यान झाले. सायंकाळी हालगीवादक राहुल गेजगे याच्या उपस्थितीत जनजागृती मशाल फेरी काढण्यात आले होते.पंचायत समितीचे पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश मुरुमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पशु चिकित्सा शिबीर, शुभदा जेऊरकर यांचे महिलांचे शिक्षण व बालविवाह निर्मूलन, नवमतदार जनजागृती व नोंदणी कार्यक्रम, डॉ. चन्नवीर भद्रेश्वरमठ यांचे पत्रकार काल,आज आणि उद्या, संचालिका पवित्रा खेडगी, ज्योती धरणे, सिद्धम्मा कलशेट्टी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रम व आरोग्य तपासणी, महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य या विषयावर डॉ. साधना पाटील व डॉ. लता रणखांबे यांचे व्याख्यान, नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विकसित भारत युवकांचा सहभाग या विषयावर प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ यांचे व्याख्यान, डॉ. श्रीकांत पाटील व डॉ. मनिष उंबराणीकर यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन, प्रा. सतीश देशमुख यांचे कवी कट्टा, विद्यार्थी – विद्यार्थ्यांनी चे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

प्रारंभी सकाळी दहा वाजता गावाच्या प्रमुख मार्गावरून विद्यार्थ्यांनी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आला. स्वच्छतादूत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वयंसेवक राम काळे यानी राष्ट्रीय सेवा योजनेचे गीत सादर करुन स्वागत केले.
प्रास्ताविक भाषण कार्यक्रम अधिकारी प्रा. सिध्दाराम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे
यांनी तर आभार प्रा. दयानंद कोरे यांनी मानले.
या समारंभास श्रावण गजधाने, चिदानंद हिरेमठ, विलास कांबळे, महिबूब तांबोळी, गणपती कोळी, प्रशांत पाटील, रवि कोरे, शंभुलिंग अकतनाळ,
ग्रामस्थ मंडळ, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग, सुमारे २५० स्वयंसेवक व स्वयंसेवीका उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले.
चौकट —
या शिबिरातील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला स्वयंसेवक हणमंत मोरे ( बी. ए. भाग दोन) यानी आपल्या मनोगतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हुबेहूब आवाजातून विचार व्यक्त करुन उपस्थितांचे मने जिंकून घेतले.