गावगाथा

अक्कलकोट मधे शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष

शिवसेना

अक्कलकोट मधे शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष

अक्कलकोट दि.१० शिवसेना शिंदे गट हीच खरी शिवसेना असुन त्यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होऊ शकत नाहीत असे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यानी जाहिर करताच अक्कलकोट तालुका शिवसेनेच्या वतीने पेढे वाटुन शहरात प्रत्येक चौकात फटक्याची आतषबाजी करण्यात आले .यावेळी तालुकाप्रमुख सजंय देशमुख म्हणाले बाळासाहेबांची शिवसेना हि हिंदुत्ववादी शिवसेना असुन ते पुढे नेण्याची ताकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या शिवसैनीका मधेच आहे. खरी शिवसेना हि आमचीच असुन अखेर सत्याचा विजय झाला आहे.ख-या शिवसैनिकना न्याय मिळाला असुन हा बाळासाहेबांच्या व दिघे साहेबांच्या शिवसैनिकांचा विजय आहे यापुढे आम्ही संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे व जिल्हाप्रमुख मनिष काळजे.यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यात शिवसेनेची ताकत वाढवण्याचे काम करणार आहोत असे देशमुख म्हणाले. आम्हाला माहित होत न्याय आम्हालाच मिळणार शिवसेना हि हिंदुत्ववादी असुन ते संपवण्यात काम कांही मुठभर लोक करत होते. त्याना अता घरी बसाव लागेल .जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जोमाने काम करणार आहोत असे विधानसभा संघटक प्रा.सुर्यकांत कडबगांवकर म्हणाले. यावेळी उप तालुकाप्रमुख बसवराज बिराजदार कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे युवासेना शहरप्रमुख विनोद मदने प्रमोद गोरे कविराज बिराजदार संतोष स्वामी महिबुब शाबादे व इतर शिवसैनिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button