गावगाथा

शासकीय योजनांचा लाभ घेऊन सोनार समाजाने आधुनिक व्हावे — युवा उद्योजक गोरक्ष वेदपाठक, प्रथमेश वेदपाठक व अभिषेक पोतदार यांचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व सोनार युवक-युवती व व्यावसायिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपला व्यवसाय अधिक विकसित करावा, असे आग्रही आवाहन यावेळी करण्यात आले.

शासकीय योजनांचा लाभ घेऊन सोनार समाजाने आधुनिक व्हावे — युवा उद्योजक गोरक्ष वेदपाठक, प्रथमेश वेदपाठक व अभिषेक पोतदार यांचे आवाहन

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर प्रतिनिधी :
दिनांक २८ डिसेंबर रोजी सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोनार समाज गौरव सोहळा व शासकीय योजना माहिती शिबिरासाठी समाजातील युवक, कारागीर व सराफ व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मोडनिंब येथील युवा उद्योजक इंजिनिअर गोरक्ष वेदपाठक, माढा येथील इंजिनिअर प्रथमेश वेदपाठक आणि वागदरी येथील युवा उद्योजक अभिषेक पोतदार यांनी संयुक्तपणे केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सोनार समाजाचा पारंपारिक सराफ व्यवसाय अत्यंत प्रतिष्ठित असून सध्याच्या स्पर्धात्मक युगात शासकीय योजनांचे पाठबळ घेणे काळाची गरज आहे. नरहरी आर्थिक विकास महामंडळ, पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, पीएम विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना आदी योजनांमुळे व्यवसायाचे आधुनिकीकरण करणे व आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे शक्य आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

“आम्ही उच्च शिक्षित असूनही नोकरीच्या मागे न लागता पारंपारिक, प्रतिष्ठित सराफ व्यवसाय स्वीकारला आहे. या क्षेत्रातील आव्हाने आम्ही स्वतः अनुभवली असून सोनार समाज संस्था, सोलापूर यांच्या वतीने आयोजित हे शिबीर समाजासाठी एक सुवर्णसंधी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

तरी जिल्ह्यातील सर्व सोनार युवक-युवती व व्यावसायिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपला व्यवसाय अधिक विकसित करावा, असे आग्रही आवाहन यावेळी करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button