वटवृक्ष मंदिरात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी
प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते देवीजींची संपन्न झाली आरती

वटवृक्ष मंदिरात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी
प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते देवीजींची संपन्न झाली आरती
देवस्थानच्या वतीने प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते भाविकांना मसाला दूध प्रसादाचे वाटप

(अक्कलकोट, दि.१६/१०/२४) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे कोजागरी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रध्देने साजरी करण्यात आली. रात्री ८ वाजता देवीजींच्या स्थापना मंडप द्वाराची विधीवत पुजा करुन द्वार उघडण्यात आले. यानंतर पुरोहित मंदार पुजारी यांच्या अधिपत्याखाली पुरोहितांच्या मंगलमय मंत्रोच्चारात मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते विधिवत लघुरुद्र करुन देवीस महानैवेद्य व कोजागरी पौर्णिमेस विशेष मान असणारे मसाला दुध प्रसाद दाखविण्यात आले. यानंतर मंदिर समितीच्या वतीने प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते दुध प्रसाद वाटप करण्यात आले. हजारो स्वामी भक्तांनी याप्रसंगी या दुध प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, गिरीश पवार, धनराज पाटील, दर्शन घाटगे, किरण साठे, तुषार मोरे,
सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, स्वामीनाथ लोणारी आदिंसह हजारो भाविक उपस्थित होते.

फोटो ओळ – देवीजींची आरती करताना प्रथमेश इंगळे, आत्माराम घाटगे, रवी जोशी, राघवेंद्र बागेवाडीकर व अन्य ब्रह्मवृंद दिसत आहेत.
