गावगाथा

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे गेल्या ३६ वर्षातील उल्लेखनीय कार्यामुळे आज न्यासाचे नांव सातासमुद्रापार पोचल, अन्नछत्र हे आम्हा फडणवीस कुटुंबियांचे श्रद्धास्थान :उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस*

न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे गेल्या ३६ वर्षातील उल्लेखनीय कार्यामुळे आज न्यासाचे नांव सातासमुद्रापार पोचल, अन्नछत्र हे आम्हा फडणवीस कुटुंबियांचे श्रद्धास्थान :उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस*

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास गेल्या ३६ वर्षातील उल्लेखनीय कार्यामुळे आज न्यासाचे नांव सातासमुद्रापार केले असून, महाप्रसादाच्या सेवेबरोबरच विविध उपक्रम हे धाडशी नेतृत्व व प्रबळ इच्छाशक्तीमुळेच प्रचंड विस्तार होत आहे. अन्नछत्र हे आम्हा फडणवीस कुटुंबियांचे श्रद्धास्थान असल्याचे मनोगत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात आले असता, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फडणवीस कुटुंबीय आम्ही श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी स्वामी भक्तच, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, हे स्वामींची प्रचितीच आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे गेली ३६ वर्ष सातत्याने महाप्रसाद वाटपाची जवाबदारीने व अत्यंत भक्ती भावाने पार पाडली आहे. आज अन्नछत्र मंडळाच्या भविष्यातील विस्तारित अतिभव्य प्रसादालायाचे संकल्प चित्र बघायला मिळाले. ते अतिशय उत्तम असून,अक्कलकोटमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची काळजी घेऊन, पुढील २५ ते ५० वर्षाच्या विचार करून रेखाचित्र बनविलेला आहे. या प्रकल्पास माझ्या खूप खूप शुभेच्छा..!

HTML img Tag Simply Easy Learning    

दरम्यान मंडळाच्या वतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या महाप्रसाद गृहाच्या वास्तूची संपूर्ण माहिती ना. देवेंद्र फडणवीस यांना न्यासाचे वास्तुविशारद योगेश अहंकारी यांनी दिली. ना.फडणवीस यांच्या हस्ते महाप्रसाद गृहाच्या भूमिपूजन करण्यात येणार असल्याने, त्याची तारीख लवकरच देण्याचे ना.फडणवीस यांनी मान्य केले. याबरोबरच समर्थ महाप्रसाद सेवा व तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराक वाटपाची माहिती ना. फडणवीस यांना देण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

याप्रसंगी त्यांच्या समवेत दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष (बापू) देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, भाजपा माजी भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, चेतनसिंह केदार, मोतीराम राठोड, दत्ता शिंदे, यशवंत धोंगडे, राजकुमार झिंगाडे, अभिजित गुंड हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, लाला राठोड, अँड.संतोष खोबरे, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, वास्तुविशारद योगेश अहंकारी, रोहित खोबरे, सौरभ मोरे, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, मनोज निकम, वैभव पोतदार, अरविंद शिंदे, पुरोहित संजय कुलकर्णी, विश्वंभर पुजारी, सोमकांत कुलकर्णी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, एस.के.स्वामी, बाळासाहेब घाडगे, कल्याण देशमुख, दत्ता माने, महेश मुळे, निखील पाटील, गोटू माने, कार्तिक पाटील, विजयकुमार पवार, संजय जाधव, महादेव अनगले, प्रथमेश पवार, शुभम कामळूरकर, बालाजी यादव, शुभम सावंत, सचिन स्वामी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button