*डॉ.अमोगसिद्ध चेंडके यांच्या ग्रंथाचे प्रकाशन*
डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांनी लिहिलेल्या 'वारकरी संप्रदाय : साहित्य आणि तत्त्वज्ञान' ग्रंथाचे प्रकाशन सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर महाराजांच्या हस्ते करण्यात आले

*डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांच्या ग्रंथाचे प्रकाशन*

डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांनी लिहिलेल्या ‘वारकरी संप्रदाय : साहित्य आणि तत्त्वज्ञान’ ग्रंथाचे प्रकाशन सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर महाराजांच्या हस्ते करण्यात आले. ह्या ग्रंथातून डॉ. अमोगसिद्ध यांनी वारकरी संप्रदायाचा उदय, साहित्य आणि तत्वज्ञान याचा वेध घेतला आहे. तसेच वारकरी संतांच्या भक्तीविचाराची मांडणी केली आहे. ह्या ग्रंथलेखनाबद्दल औसेकर महाराज यांनी विशेष कौतुक केले.

डॉ. अमोगसिद्ध शिवाजी चेंडके यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त झाली. यापूर्वीच त्यांनी ‘वारकरी आणि सुफी संप्रदाय’ या विषयावरचा संशोधन प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. त्या निमित्ताने ह भ. प. आबा महाराज कुरनूरकर यांच्या कुटुंबाच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यांचा सन्मान सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
