गावगाथा

श्रीराम मंदिरात शास्त्रीय उपशास्त्रीय गायनसेवेचे आयोजन – महेश इंगळे

फोटो ओळ - छायाचित्रात प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण यांची प्रतिमा दिसत आहे.

श्रीराम मंदिरात शास्त्रीय उपशास्त्रीय गायनसेवेचे आयोजन – महेश इंगळे

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, )
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित स्टेशन रोड वरील श्रीराम मंदिरात अभिषेक, भजन, नामस्मरण, प्रसाद वाटप आदी कार्यक्रमांसह आता श्रीराम मंदिरात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सेवेचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व श्री राम मंदिराचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. उद्या सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी अयोध्यातील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त दुपारी ४ ते ६ या वेळेत अक्कलकोटचे सुप्रसिद्ध शास्त्रीय उपशास्त्रीय गायक मनोहर देगावकर (संगीत अलंकार) यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सेवेचे आयोजन करण्यात आलेले आहे, तरी जास्तीत जास्त भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या दर्शनासह, धार्मिक कार्यक्रम व गायनसेवेचाही लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button