गावगाथा

मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ अक्कलकोट तालुक्यातून शेकडो समाज बांधवांचे मुंबईच्या दिशेने प्रस्थान

मराठा आरक्षणावर आंदोलन

मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ अक्कलकोट तालुक्यातून शेकडो समाज बांधवांचे मुंबईच्या दिशेने प्रस्थान

🔶अक्कलकोट :* दि.२२, (प्रतिनिधी)
*मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अक्कलकोट तालुक्यातून शेकडो समाज बांधवांचे मुंबईच्या दिशेने प्रस्थान झाले.*

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणी करिता संपूर्ण महाराष्ट्रातून सकल मराठा समाज मुंबईकडे रवाना होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने राजे फत्तेसिंह चौक येथे एकत्र येऊन आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत सोलापूरच्या दिशेने प्रस्थान झाले.

सोलापूर येथे राजा छत्रपती संभाजी महाराज चौकात सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या सोबत सामील होऊन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने मोठ्या संख्येने रवाना झाले. काही वेळ पुणे-सोलापूर महामार्गवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. उद्या मंगळवारी पुणे येथे जरांगे-पाटील यांच्या ताफ्यामध्ये सदर सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांचा समूह सहभागी होईल.

अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट शहर, चुंगी, किणी, किणीवाडी, बावकरवाडी, कोळेकरवाडी, समर्थ नगर, कुरनूर, हन्नूर, मोट्याळ, सिंदखेड, दहिटणे, दहिटणे वाडी, चपळगांव, मराठवाडी, उडगी, सुलेरजवळगे, शिरसी, शावळ, आंदेवाडी, पानमंगरूळ, देविकवठा, जेऊर, दोड्याळ, बणजगोळ, कर्जाळ, चिक्केहळ्ळी, सांगवी, शिरवळ, गोंगाव, बोरगांव दे, घोळसगांव, काळेगांव, मैंदर्गी यासह गांव, वाड्या, वस्त्यातून शेकडो सकल मराठा बांधव सामील झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button