*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्रीरामजन्मभुमी अयोध्या येथे श्रीराम मंदिर लोकार्पण व श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त महाप्रसादासह स्वामी भक्तांना ४०० किलो बुंदीचे वाटप*
मिठाई वाटप

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्रीरामजन्मभुमी अयोध्या येथे श्रीराम मंदिर लोकार्पण व श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त महाप्रसादासह स्वामी भक्तांना ४०० किलो बुंदीचे वाटप*

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी श्रीरामजन्मभुमी अयोध्या येथे श्रीराम मंदिर लोकार्पण व श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त अन्नछत्र मंडळात महाप्रसादासह स्वामी भक्तांना ४०० किलो बुंदीचे वाटप करण्यात आले. दिवसभर शेकडो भक्तांनी अन्नछत्र मंडळात श्रीराम मंदिर प्रतिमेचे दर्शन घेतले. श्रीराम जय जय राम..! च्या जयघोषाने परिसरात भक्तिमय वातावरणाने फुलला होता.*

दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या महाप्रसाद गृहात स्वामींच्या मूर्तीजवळ ठेवण्यात आलेल्या पवित्र मंगल अक्षता व श्रीराम मंदिर प्रतिमेचे पूजन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते.

स्वामीभक्त माणिकराव बिराजदार -बोरगांवकर, यांनी श्रीरामजन्मभुमी अयोध्या येथे श्रीराम मंदिर लोकार्पण व श्रीराम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्यसाधून अन्नछत्र मंडळास ५ फुटी लांबी असलेली व १२ तास तेवत राहणारी चंदनाची अगरबत्ती भेट दिली. सदर अगरबत्ती न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते महाप्रसादालयात लावण्यात आली.

यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, सौरभ मोरे, अभियंता अमित थोरात, बाबुशा महिंद्रकर , शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, प्रा.प्रकाश सुरवसे, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, राज पवार, देवराज हंजगे, शरद भोसले, चंद्रकांत हिबारे, शावरेप्पा माणकोजी, शिवू स्वामी, श्रीपाद चव्हाण, संभाजीराव पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.